Renuka Gundre 
मराठवाडा

रेणुकाच्या मदतीला सरसावले अनेकांचे हात

विवेक पोतदार

जळकोट (लातूर) : येथील रेणुका दिलीप गुंडरे हिचे बालपणी वडिल तर दहावीच्या निकालाच्या आदल्या दिवशी आईचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यामुळे संकटात सापडलेल्या व दहावीत ९३.२० टक्के गुण मिळवलेल्या चिमुकलीची 'आई...मी पास झाले ग... निकाल कोणाला सांगू? अशी ह्रदयद्रावक कहाणी दै.सकाळने मांडल्यानंतर मदतीचा ओघ सुरु झाला असून माणूसकीचे दर्शन घडत आहे.

शंभर, दोनशे रुपयापासून पंचवीस हजार रूपयापर्यत ही मदत केली जात आहे. त्यामुळे रेणुकाच्यावतीने सरपंच, ग्रामस्थ आभार व्यक्त करत आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांकडून मदतीचा हात महावितरण कंपनी सर्व कर्मचाऱ्यांच्यावतीने मदत करण्यात आली. यावेळी शिरुर ताजबंद येथील उपविभागीय अभियंता शिवशंकर सावळे यांनी रेणुकाचे सांत्वन करत १२ हजार १०० रूपयाची ही मदत त्यांनी रेणुकाकडे सुपूर्द केली. कर्मचाऱ्यांनी हा मदतीचा हात दिला.

यावेळी सरपंच माधव भुरे, उपविभागीय अभियंता शिवशंकर सावळे, कनिष्ठ अभियंता विजयकुमार शेरेकर, एस.एस.बेरूळे, दयानंद घटकार, अशोक ढवळे, नामदेव डोंगरगावे, एस.एस.यादव, एस.एस. नागरगोजे, साईनाथ बोइनवाड, शरीफ शेख(होकर्णा), नितिन बिलापट्टे, सतिश मुसळे, चंद्रकांत कोतवाड आदि उपस्थित होते.

डाॅ.भुरे यांच्याकडून रेणुकाला एक लाखाची मदत... 

आई वडिलांचे छत्र हरवलेल्या कु. रेणुका दिलीप गुंडरे हिला डाॅ.नामदेवराव भुरे यांनी एक लाख रुपयांची मदत दिली आहे. डाॅ.भुरे हे मुळचे होकर्णा येथील रहिवाशी असून त्यांचे नांदेड येथे अंकुर हाॅस्पिटल आहे. कुटुंबियाच्यावतीने आपल्या गावातील अडचणीत सापडलेल्या कु.रेणुकाला ही मदत दिली आहे. यावेळी नांदेडचे डाॅ.नामदेवराव भुरे, डाॅ.सुचिता भुरे,लक्ष्मीबाई भुरे, व्यंकटराव भुरे, माधव भुरे, उत्तम भुरे, प्रा. दिगंबर शेकापुरे, सरपंच माधव भुरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित  होते.

जिल्हा परिषद शाळेकडून मदत... 

होकर्णा (ता.जळकोट) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक बांधवाकडून ३१ हजार ५०० रुपयांची मदत केली .

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT