Maratha community sakal
मराठवाडा

Maratha Community Survey : राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणात मी कोण? ब्राह्मण समाजाला पडला प्रश्न!

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात पर्याय निवडताना ब्राह्मण समाजात संभ्रम निर्माण झाला आहे.

आनंद खर्डेकर

परंडा - महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात पर्याय निवडताना ब्राह्मण समाजात संभ्रम निर्माण झाला आहे.

दिलेल्या पर्यायात मी कोण? असा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुंटुबांची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेण्यात येत आहे. २३ जानेवारी ते ३१ जानेवारी या कमी काळात हे सर्व्हेक्षण नियुक्त अधिकारी कर्मचारी यांचेकडून करण्यात येत आहे.

खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करताना ब्राम्हण कुटुंबीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यावेळी ब्राम्हण कुंटुबीयाना प्रश्नावली मध्ये लाड ब्राम्हण, दैवज्ञ ब्राह्मण, भिक्षुकी ब्राह्मण, ब्रम्हभट, विश्व ब्राह्मण, जोशी ब्राह्मण असे सहा पर्याय दिलेले आहेत. बहुतांक्षी ब्राहमणांना फक्त देशस्थ ब्राह्मण, कोकणस्थ ब्राह्मण, कण्व ब्राह्मण, सीकेपी, सारस्वत ब्राह्मण अशीच माहिती आहे.

सर्व्हेक्षणात मात्र हे पर्याय नसल्याने आपण कोण? असा प्रश्न ब्राह्मण कुंटुबांतील अनेकांना पडला आहे. अनेक ब्राह्मणांच्या शालेय दाखल्यावर हिंन्दू - ब्राह्मण असाच उल्लेख असल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या पर्यायांचा अर्थ लावताना संभ्रम निर्माण झाला आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर पुन्हा पर्यायाबाबत शंका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

अनेक जुन्या पिढीतील ब्राह्मणांना देखील सर्वेक्षणात दिलेल्या पर्यायाची फारशी माहिती नसल्याने संभ्रम वाढणार आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने देखील याची दखल घेणे गरजेचे आहे. अन्यथा सर्वेक्षण पूर्ण करताना सर्वेक्षण करणारे अधिकारी कर्मचारी यांना अडचणी येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप नगरसेवकांच्या बसचा अपघात, नियंत्रण सुटलं अन् हॉटेलच्या भिंतीला धडकली

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

MNGL Fraud : एमएनजीएल गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने महिला वकिलाची ४.९८ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Latest Marathi News Live Update : जोपर्यंत मी राहील तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहील- वाजे

MNGL Fraud : एमएनजीएलच्या नावाने व्हॉट्सॲप एपीके फाईल; १३ रुपयांच्या बहाण्याने क्रेडिट कार्डवरून ३.६४ लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT