Maratha Morcha Protest Sakal
मराठवाडा

Maratha Morcha Protest: मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको; 'या' कारवाईचे जिल्ह्यासह राज्यात पडसाद उमटले

45 पोलिस अधिकारी, कर्मचारी, 50 पेक्षा अधिक ग्रामस्थ जखमी झाले होते.

उमेश वाघमारे

Maratha Morcha Protest, जालना - अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रूधुरा नळकांड्या आणि प्लास्टिक बुलेटचा मारा केला. जालना शहरात अंबड चौफुलीवर शनिवारी (ता. दोन) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अंतरवाली सराटी येथे शुक्रवारी (ता. एक) मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज आणि प्लास्टिक बुलेटचा मारा केला होता. तर ग्रामस्थांनी दगड फेक केली.

यात 45 पोलिस अधिकारी, कर्मचारी, 50 पेक्षा अधिक ग्रामस्थ जखमी झाले होते. पोलिसांच्या या कारवाईचे जिल्ह्यासह राज्यात पडसाद उमटले आहेत.या निषेधार्थ शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत वीस बस आणि काही खाजगी वाहने जाळण्यात आले होते.

शनिवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना बंदची हाक देण्यात आली होती याला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. तर अंबड चौफुली परिसरामध्ये सकल मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे जालना-अंबड, जालना-नांदेड मार्ग ठप्प झाला होत. आंदोलन स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT