Maratha mukti sangram din sakal
मराठवाडा

Marathwada Mukti Sangram Day : राष्ट्रध्वजाला २० वर्षांपासून विनामोबदला इस्त्री

राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री करून देत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत.

जगदीश जोगदंड

पूर्णा : येथील लाँड्री व्यावसायिक साई चंद्रय्या राजकुंडल (वय ६२) हे राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री करून देत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत. २० वर्षांपासून ते हा उपक्रम राबवीत आहेत. राजकुंडल यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह लाँड्री व्यवसायावर आहे. त्यांची आर्थिक स्थिती बेताची असली तरी राष्ट्रभक्तीची मोठी श्रीमंती त्यांच्याकडे आहे. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त तालुक्यातील विविध शासकीय निमशासकीय कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो.

एक-दोन दिवस अगोदर त्या ध्वजास इस्त्री करावी लागते. राजकुंडल यांच्या लाँड्रीवर कुणी राष्ट्रध्वज इस्त्री करण्यासाठी घेऊन गेले तर त्या कामाचे ते मोबदला घेत नाहीत. केवळ विनम्रपणे हात जोडतात. त्यांच्या या अनोख्या राष्ट्रभक्तीचे अनेकजण कौतुक करतात. या बाबत राजकुंडल म्हणाले, ‘‘प्रत्येकजणच राष्ट्रावर आपआपल्या परीने प्रेम व्यक्त करीत असतो. सुरुवातीला मीही पैसे घेत होतो. पण, एक दिवस देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानाचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळलेले वर्तमानपत्रात पाहिले. मनात विचार आला की, या ध्वजासाठी किती जणांनी बलिदान दिले, तेव्हा आपणास तिरंगा मिळाला. त्याच्या इस्त्रीचे पैसे घेणे उचित नाही. अन्य कपडे इस्त्री केली की पैसे मिळतातच. पण, राष्ट्रध्वज पैसे कमावण्यासाठी नाही तर त्या प्रति असलेली श्रद्धा व्यक्त करण्याची आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUC Fee Hike: वाहनचालकांना मोठा झटका! महाराष्ट्रात PUC तपासणीचे दर वाढले, आता किती पैसे मोजावे लागणार?

IND vs SL: रिषभ पंत अचानक मैदानातून का बाहेर गेला? रिटायर्ड हर्ट झाल्याने रवींद्र जडेजा मैदानात आला

Pune Crime: पुण्यात गुन्हेगारीचा थरार! मार्केट यार्डमध्ये तरुणाचा खून, बिबवेवाडीत तरुणावर जीवघेणा हल्ला

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओचा टायर अचानक फुटला

Marathi News Live Updates : विडी उद्योजकांकडून महाराष्ट्र सोडूण्याचा इशारा, कारण काय?

SCROLL FOR NEXT