Raj Thackeray Esakal
मराठवाडा

Raj Thackeray: मराठा आंदोलक आक्रमक! जालन्याला जाताना राज ठाकरेंच्या ताफ्याला तीनवेळा घ्यावा लागला ब्रेक

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी पोहोचले

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आंदोलकांवर जालन्यामध्ये पोलिसांनी लाठीमार केला याचे पडसाद गेल्या ३ दिवसांपासून दिसून येत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात, शहरात बंद पुकारण्यात आले आहेत. राज्याच्या अनेक भागात आंदोलन केले जात आहे. त्यामुळे ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुण्यातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील अनेक नेते जालन्यात आंदोलकांच्या भेटीसाठी जात आहेत. आतापर्यंत शरद पवार, उध्दव ठाकरे, संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले, गिरीश महाजन या नेत्यांनी जालन्यात जाऊन आंदोलकांची भेट घेतली आहे. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जालन्यात जात आहेत.

या संपुर्ण प्रकरणानंतर मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे जालन्याला जात असतानाच आंदोलकांनी तीन वेळा त्यांचा ताफा थांबवला आहे.

राज ठाकरे हे सकाळी जालन्याकडे निघाले. राजापूर जवळ मराठा आंदोलकांची निदर्शने चालू असतानाच राज ठाकरे यांचा ताफा आल्याचं समजल्यानंतर आंदोलकांनी राज ठाकरे यांचा ताफा थांबवला. राज ठाकरेंनी मराठा आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला. राज ठाकरेंनी त्यांना शांत राहण्याचं आवाहनही यावेळी केलं आहे.

आंदोलकांनी राज ठाकरे यांना निवेदन दिलं. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. राज ठाकरे यांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पुन्हा त्यांचा ताफा राजापूरकडे रवाना झाला. त्यानंतर पुढे दाभरूळ गावात पुन्हा आंदोलकांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांना निवेदने दिली.

त्यानंतर पुढे पैठणच्या आडगाव जावळेतही त्यांचा ताफा थांबवण्यात आला. त्यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवादही साधला. मी घटनास्थळी गेल्यावर माझी भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. या राजकारण्यांच्या नादी लागू नका. या लोकांना फक्त तुमची मते हवी आहेत, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Jorhat Airbase Incident Video : हवाई दलाच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण आग, ५ जवान शहीद; दुर्घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Sangli Crime: वेदांत बंडगर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार निलेश गडदे कर्नाटक सीमेजवळ अटक; एलसीबीची धडक कारवाई

Pune Nashik High Speed: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मूळ आराखड्यानुसारच; जीएमआरटी अडथळा नसल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष

मोठी बातमी! वैभव सूर्यवंशीला सरावादरम्यान दुखापत; प्रॅक्टिस अर्धवट सोडून बाहेर पडला, श्रीलंका ए विरुद्धचा सामना खेळणार का?

SCROLL FOR NEXT