Manoj Jarange sakal
मराठवाडा

Manoj Jarange : पोलिसांकडून सहकाऱ्यांना नाहक त्रास ; आंदोलन दडपण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही

पोलिसांकडून विनाकारण आमच्या सहकाऱ्यांना त्रास दिला जात आहे. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

वडीगोद्री, (जि. जालना) : पोलिसांकडून विनाकारण आमच्या सहकाऱ्यांना त्रास दिला जात आहे. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. शुक्रवारी जरांगे यांना अशक्तपणा, अपचनाचा त्रास झाल्याने त्यांच्या छातीत दुखत होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी डॉ. चावरे, वडीगोद्री येथील डॉ. राजेंद्र तारख व सहकाऱ्यांनी अंतरवालीत त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले. त्यांची तब्येत सध्या स्थिर आहे.

शनिवारी जरांगे म्हणाले, आमच्यावर अन्याय करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमली आहे. आम्ही काही न करता आमच्यामागे एसआयटी लावत असाल, तर आत्महत्या केलेल्या मराठाबांधवांचे कुटुंबीय सरकारविरोधात ‘३०२’चे खटले दाखल करतील. फडणवीस यांनी पोलिसांच्या माध्यमातून पोरांचा छळ सुरू केला आहे. जालन्याच्या एसपींच्या माध्यमातून जाणीवपूर्वक लोकांना बोलावून त्यांच्यावर दहशत निर्माण केली जात आहे. हे प्रकार न थांबल्यास प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये संपूर्ण तालुका जाऊन जाब विचारेल, असा इशारा जरांगे यांनी दिला.

भुजबळांसोबत समेट नाहीच

गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचे खास आहेत. फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला. निवडणूक झाल्यावर आरक्षण उडविण्याचा यांचा डाव आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत कधीच समेट होणार नाही, असेही जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले.

निवडणूक लढवणार नाही

जालना किंवा बीडमधून आपण लोकसभा निवडणूक लढविणार नाही. माझा राजकारण हा मार्ग नाही. मी समाजाचा आदर करतो. मी निवडणूक लढविणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली. गृहमंत्री फोन टॅप करत आहेत. मी कुठेही यायला तयार आहे. माझी नार्को टेस्ट करा, एसआयटी चौकशी लावली आहे. त्याला समाज उत्तर देईल. त्यांनी मला अटक करून दाखवावी. मग समजेल आंदोलनाचा टेंपो कमी झाला की वाढला, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपुरात मुसळधार! शाळा पाण्यात, रस्त्याचं काम वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका; पाणीच पाणी

Mumbai Local: मुंबई लोकलला प्रवाशांमुळे उशीर, रेल्वे प्रशासनाचा दावा; नेमकं प्रकरण काय?

Thane Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, शाळेसमोरच सुरू होता प्रकार; ५ तरुणींची सुटका; दोघांना अटक

फाळणीची जखम आणि आशेचा किरण! प्रीती झिंटा अन् सनी देओलच्या 'बटवारा १९४७' चित्रपटाची पहिली झलक

Latest Live Updates Marathi : मुसळधार पाऊस, नागपूर खंडपीठातील वकिलांच्या दालनासमोर साचलं पावसाचे पाणी

SCROLL FOR NEXT