maratha reservation an attempt to fire the hingoli bjp office crime police maratha protesters Sakal
मराठवाडा

Maratha Reservation : हिंगोलीत भाजप कार्यालय जाळण्याचा अज्ञात मराठा आंदोलकांचा प्रयत्न

मराठा आरक्षणासाठी सर्वत्र आंदोलने सुरु आहेत आता याला हिंसक वळण

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : मराठा आरक्षणासाठी सर्वत्र आंदोलने सुरु आहेत आता याला हिंसक वळण लागत आहे. हिंगोलीतही त्याचे पडसाद दिसत आहेत. हिंगोली येथे सोमवारी ता.३० रात्री साडेदहा वाजता ह् भाजपचे जिल्हा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न काही अज्ञात मराठा आंदोलकांनी केला.

येथील भाजप जिल्हा कार्यालयात सुरक्षेच्या कारणास्तव बंदच ठेवण्यात आले होते. तसेच दुपारनंतर या कार्यालयाला पोलीस बंदोबस्तही दिला होता. मात्र रात्री अज्ञात आंदोलकांनी पेट्रोलची बॉटल सोबत आणून शटरवर ओतली. या ठिकाणी असलेल्या होमगार्डचा मोबाईल हिसकावला, तर आग लावून घोषणा देत निघून गेले. यानंतर होमगार्ड व इतर पोलिसांनी धावाधाव करीत आग विझवली.

शटर उघडल्यानंतर आतमध्ये कार्यालयाच्या काचा तडकल्याचे निदर्शनास आले. इतर काही नुकसान झाले नाही. या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांनी भेट देऊन पाहणी केली. एका शटरचे कुलूपही तोडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ते कुलूप उघडत नव्हते. दुसरे शटर उघडल्यानंतर आतमध्ये धूरच धूर पसरल्याचे उपस्थितांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election Update : तयारीला लागा! जिल्हा परिषद निवडणुकीची पुढील आठवड्यात घोषणा, राज्य निवडणूक आयोगाकडून संकेत

Pune Air Pollution : पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावतेय; महापालिकेच्या निष्क्रियतेवर नाराजी

Karnataka : राज्यातील पाच जिल्हाधिकारी कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिस यंत्रणा सतर्क, दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

'बसमध्ये पत्नीचा पतीवर चाकू हल्ला'; बार्शी शहरातील धक्कादायक घटना; आई, भावास बेदम मारहाण, नेमकं काय कारण?

कारला धडकल्यानंतर पिकअपला लागली आग; तिघांचा होरपळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT