Bhokardan agitation for Maratha Reservation sakal
मराठवाडा

Maratha Reservation : भोकरदनला मुख्य रस्त्यावर टायरे जाळून रास्ता रोको; वाहतूक ठप्प

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी तालुक्यातील विविध भागात आंदोलने सुरू आहे.

दीपक सोळुंके

भोकरदन (जिल्हा जालना) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी तालुक्यातील विविध भागात आंदोलने सुरू आहे. याच मुद्द्यावरून (ता. ३०) सोमवारी दुपारी एक वाजेदरम्यान शहरातील जाफ्राबाद मुख्य रस्त्यावर काही तरुणांनी एकत्र येत अचानक जोरदार घोषणाबाजी सुरू केली व येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर रास्ता रोको करून टायरे व लाकडे जाळून वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.

या आंदोलनामुळे जाफ्राबाद, बुलढाणा, अकोला तसेच तालुक्यातील व विदर्भाकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहे. याशिवाय या परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आले असून, तरुणांकडून 'एक मराठा लाख मराठा' आशा जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

अचानक करण्यात आलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे या भागाकडे जाणाऱ्या प्रवासी व नागरिकांची गैरसोय झाली. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण जाहीर करण्याची मागणी यावेळी सकल मराठा समाजाच्या तरुणांकडून करण्यात आली.

तरुणांकडून आमरण उपोषणाला सुरुवात

मराठा आरक्षणासाठी अंबड तालुक्यातील अंतरावली सराटी येथे उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते मनोज जरंगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून व मराठा समाजाला तात्काळ आरक्षण जाहीर करावे. या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या काही तरुणांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर (ता. ३०) सोमवार पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking: जर्मनीचा खेळ खल्लास... पॅराग्वेचा पेनल्टी शूट आऊटमध्ये रोमहर्षक विजय, Fifa World Cup स्पर्धेतून माजी विजेते बाहेर

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

SCROLL FOR NEXT