maratha reservation maratha reservation
मराठवाडा

'परिवहन सोडता शासनाच्या इतर विभागांत नोकऱ्या द्या'

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर निघालेल्या मूक मोर्चानंतरही कुठलीही दखल न घेतल्याने तीन वर्षांपूर्वी ठोक मोर्चे निघाले

सकाळ वृत्तसेवा

बीड:Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळात नेमणुकीची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, शासन दोन लाखांवर जागा भरणार असल्याने या वारसांना इतर विभागांत नोकऱ्या द्याव्यात, अशी मागणी वारसांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तसेच परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांना निवेदन देण्यात आले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर निघालेल्या मूक मोर्चानंतरही कुठलीही दखल न घेतल्याने तीन वर्षांपूर्वी ठोक मोर्चे निघाले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणासाठी जलसमाधी घेतली. त्यानंतर याच मागणीसाठी राज्यात ४२ तरुणांनी आत्मबलिदान दिले. दरम्यान, तत्कालीन महायुती सरकारने बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत आणि शासकीय नोकरीची घोषणा केली. मात्र, अद्याप दोन्ही घोषणांची पुर्तता झाली नाही. बलिदान देणाऱ्यांमध्ये जिल्ह्यातील ११ व्यक्तींचा समावेश असून सात कुटुंबीयांना पाच लाखांची मदत मिळाली आहे. दरम्यान, आता या वारसांना राज्य परिवहन महामंडळात नोकरी देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

मात्र, आम्हाला एसटी महामंडळ ऐवजी शासनाच्या महसूल, ग्रामविकास, शिक्षण, कृषी, जलसंपदा, वनविभाग या विभागांत शैक्षणिक अर्हतेनुसार नोकऱ्या द्याव्यात अशी मागणी बलिदान देणाऱ्यांचे वारस अण्णा काटे, गोरक्षनाथ शिंदे, हरिओम येवले, रामेश्वर काळे, सचिन देशमुख, चंद्रकांत बेदरे, मच्छिंद्र जाधव, सुरज काटे, विकास हावळे, कृष्णा पैठणे आदींनी केली आहे. गंगाधर काळकुटे, संतोष गुजर यांनी निवेदन दिले. आर्थिक मदत तत्काळ मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medha Kulkarni Hospitalized : भाजप खासदार मेधा कुलकर्णी रूग्णालयात दाखल ; काही दिवस संपर्कात नसणार!

Uddhav Thackeray : दगाबाज रे.. सरकार पॅकेजचे काय झाले? उद्धव ठाकरे यांनी भुम, परंडा, वाशी या भागाचा केला पाहणी दौरा

ट्रेनच्या शौचालयात ‘प्रेम’ व्यक्त करणाऱ्यांनो सावधान! आता कुणाचा नंबर किंवा नाव लिहिलंत तर...; रेल्वे प्रशासनाचा थेट इशारा

पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग... एसटी पेट्रोल पंप सर्वांसाठी खुले होणार! सुविधा कुठे उपलब्ध असणार?

Vegetable Vendor Wins 11 crore Lottery Video : नशीब असावं तर असं! मित्राच्या पैशाने लॉटरीचं तिकीट खरेदी केलेल्या भाजी विक्रेत्याने जिंकलं तब्बल ११ कोटींचं बक्षीस

SCROLL FOR NEXT