maratha reservation girl misses job opportunity by two-three marks father strike indefinite fast sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मुलीची दोन-तीन मार्कांनी नोकरीची संधी हुकली; पित्याचे अन्नपाणी त्यागत बेमुदत उपोषण

मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण नसल्याने संधी मिळत नाही.

सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री : शिक्षणासाठी मोठा खर्च करूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या संयुक्त क प्रवर्गाच्या परीक्षेत दोन वेळेस दोन व तीन मार्कांनी मुलीची नोकरीची संधी हुकल्याने मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, याकरिता फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे पित्याने अन्नपाणी त्याग करून कडक बेमुदत उपोषण गुरुवारी (ता.२६) पासून सुरू केले आहे. शिवाजी विठ्ठल राऊतराय (वय ५६) असे उपोषण सुरू केलेल्या पित्याचे नाव आहे.

निधोना येथील नागरिक शिवाजी राऊतराय यांना तुषार राऊतराय व अश्विनी राऊतराय ही दोन मुले आहे. अश्विनी राऊतराय हिला उच्च दर्जाचे शिक्षण देऊन एम.एस्सी. पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रवर्ग क दर्जाची संयुक्त परीक्षा दिली. मात्र या परीक्षेत दोन वेळेस एकदा दोन मार्काने आणि एकदा तीन मार्काने नोकरीची संधी अश्विनीची हुकली.

त्यामुळे शिवाजी राऊतराय यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे जेणेकरून मराठा समाजबांधवांना आपल्या मुलांचे शिक्षण चांगले करता येईल आणि त्यांना नोकरीच्याही संधी उपलब्ध होईल.

यासाठी सरकारने मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणे गरजेचे आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी निधोना येथे अन्नपाणी त्याग करून कडक बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आजचा शिवाजी राऊतराय यांचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

माझा मुलगा संभाजीनगर येथे इंजिनिअरिंग कॉलेजला शिकतो. त्याला वर्षाला ८० हजार रुपये फीस भरावी लागते. तर मुलीला दोन वेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गट क भरतीत दोन - तीन मार्कांनी संधी हुकली. मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण नसल्याने संधी मिळत नाही. माझे उपोषण केवळ माझ्या मुलाबाळांसाठी नाही तर वंचित गरीब मराठा समाजातील लाखो विद्यार्थी, तरुणांना न्याय देण्यासाठी आहे.

— शिवाजी विठ्ठल राऊतराय, निधोना, ता.फुलंब्री.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT