cm eknath shinde on manoj jarange patil 
मराठवाडा

Maratha Reservation: सरकारच्या प्रतिनिधींनी घेतली मनोज जरांगेंची भेट! 24 तासात काढला नवीन GR 

Sandip Kapde

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले होते. मात्र सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिल्यावर जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान संभाजीनगर येथील रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे किंवा मुंबई इथं देखील हलवण्यात येऊ शकते.

आज सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली. सरकार सोमवारपर्यंत मनोज जरांगे यांनी नवीन जीआर देणार आहे.

मनोज जरांगे म्हणाले, सध्या साखळी उपोषण सुरु आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. मात्र आता समिती देखील कामाला लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ तारीख देली आहे. कुणीही गैरसमज करु नये.

सरकार जो नवीन जीआर देणार आहे. पण याचा मसुदा सोमवारी येणार आहे. यापेक्षा आमच्यासाठी आरक्षण महत्वाचं आहे. समितीला आता राज्याचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा भावांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. आता संपूर्ण मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे, असे जरांगे म्हणाले.

सरकारच्या प्रतिनिधींनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. शिंदे समितीची व्याप्ती ही राज्याची झाली पाहीजे. ही जरांगे यांची मागणी होती. त्यानुसार आता नवीन जीआर काढल्या जाणार आहे. मसुदा सोमवारी येणार आहे, मंगेश चिवटे यांनी ही माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT