Maratha Resrvation Sakal
मराठवाडा

Maratha Reservation : "सर्व प्लॅनिंगने झालं, मला मुस्लिम मित्राने दवाखान्यात नेलं"; जखमी आंदोलकाने पवारांसमोर मांडली आपबिती

जालन्यातील मराठा आंदोलन चिघळलं आहे.

दत्ता लवांडे

जालना : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चालू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून काल पोलिसांनी आंदोलकांवर लाठी चार्ज आणि गोळीबार केला आहे. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करून गाड्या जाळल्या, बसही जाळल्या.

आंदोलकांनी केलेल्या लाठीहल्ल्यात आणि गोळीबारात अनेक आंदोलक जखमी झाले असून आज शरद पवार, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती या नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी रूग्णालयात दाखल असलेल्या आंदोलकांनी घटनास्थळी काय झालं याची आपबिती पवारांसमोर मांडली आहे.

"माझ्या डोक्याला लागलं आहे. पूर्ण प्लॅनिंग करून आमच्यावर हल्ला केला आहे. मला तर माझ्या मुस्लीम मित्राने उचलून नेलं, माझ्या बायकोला कुणी उचलून नेलं माहिती नाही. श्रावण महिना सुरू आहे, आम्ही माळकरी माणसं आहोत, मला उपवास आहे. आमच्यावर हल्ला करण्यासाठी बाराशे एसआरपी आणि २०० पोलिस असतील." अशा शब्दांत जखमी झालेल्या आंदोलकाने शरद पवार यांना आपबिती सांगितली.

"काल जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्यात जखमी झालेल्यांची उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्यासह जाऊन भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून आधार दिला." असं ट्वीट जयंत पाटलांनी केलं आहे.

दरम्यान, या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून यांतर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बंद पुकारला गेला आहे. या प्रकरणाचे पडसाद अनेक ठिकाणी उमटले असून रास्ता रोको आणि हल्ल्याच्या निषेधार्थ गाव बंद ठेवण्याचे निर्णय गावांनी घेतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT