Maratha Reservation Sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उपोषण! जालन्यासह 3 जिल्ह्यातील गावांनी पुकारला कडकडीत बंद

दत्ता लवांडे

जालना : मराठा आरक्षणासह अनेक मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. मंगळवारपासून सुरू असलेले उपोषण अजूनही सुरू असून मुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही त्यांनी आपले उपोषण मागे घेतले नाही. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील आणि शेजारीत तीन जिल्ह्यांतील अनेक गावांनी कडकडीत बंद पाळला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना स्वत: फोन करून उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले पण जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम असून त्यांचे उपोषण अजून सुरूच आहे. त्यानंतर उपविभागीय अधिकारी, पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस, पोलिस उपनिरिक्षकांनी उपोषणस्थळी भेट दिली . हा मुद्दा मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात यावा आणि शासन स्तरावर त्वरीत निर्णय घ्यावा असं सांगत त्यांनी उपोषणावर ठाम असल्याचं सांगितलं आहे.

उपोषणाच्या समर्थनार्थ तीन जिल्ह्यातील गावांनी पाळला बंद

जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीसह जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील अनेक गावांनी बंद पुकारला. वडीगोद्री, शहागड, विहामांडवा, उमापूर, तिर्थपुरी, साष्टपिंपळगाव, हादगाव, शहापूर, मादळमोही, कोळगाव, मांजरसुंबा, गोंदी, धोंडराई या गावातील व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी बंद पुकारत उपोषणाला पाठिंबा दिला आहे. नागरिकांचाही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वडीगोद्री ग्रामपंचायतीने गुरूवारी ग्रामसभेत ठराव घेऊन कडकडीत बंद पाळला.

मंगळवारी जालन्यातील शहागड येथे केला होता रास्ता रोको

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा बांधवांनी मंगळवारी जालना जिल्ह्यातील शहागड येथील पैठण फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी परिसरातील लाखो मराठा बांधव हजर राहिले होते. यावेळी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वरील वाहतूक वळवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT