Manoj Jarange Patil sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मनोज जरांगे यांच उपोषण स्थगित; लढा सुरूच ठेवणार, शासनाला दिला 13 ऑगस्टपर्यत वेळ

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवन चरित्रावर नाट्य प्रयोग दाखवले यात मी दोषी नाही, तरीही मला अडकवण्यात येत आहे, मी जामीन घेतला आहे, जेलमध्ये गेलो तरी मागे हटणार नाही.

दिलीप दखने

वडीगोद्री - छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवन चरित्रावर नाट्य प्रयोग दाखवले यात मी दोषी नाही, तरीही मला अडकवण्यात येत आहे, मी जामीन घेतला आहे, जेलमध्ये गेलो तरी मागे हटणार नाही, आरक्षणबाबत भूमिका बदलणार नाही.

शासनाने 13 ऑगस्टपर्यंत मराठा आरक्षणबाबत निर्णय घ्यावा, समाज बांधव, महीला यांच्या आग्रहाखातर मी पाचवे उपोषण पाचव्या दिवशी स्थगित करत आहे. असे मनोज जरांगे यांनी बुधवार ता. 24 रोजी अंतरवाली सराटी येथे प्रसार माध्यम सोबत व समाजाच्या उपस्थिती मध्ये बोलतांना सांगितले. श्री क्षेत्र नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज व गावातील महिलांच्या हस्ते फळाचा रस, पाणी, घेऊन मनोज जरांगे यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.

यावेळी जरांगे यांनी सांगितले की समाजाने मोठा आग्रह केला म्हणून सलाईन लावले, या ठिकाणी एका जागेवर बसुन काम होणार नाही, यात समाजाचे नुकसान होईल. पुणे न्यायालयाचा मी आदर करतो पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधी व न्याय मंत्रालय, गृह मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय आहे त्यांनी या माध्यमातून दबाव टाकला आहे.

राज्यात अनेक प्रकरण चालू आहे, त्यांना वेळ मिळतो. मात्र माझ्या प्रकरणात जामीन घेऊन देखील अटक वॉरंट काढले जात आहे. फडवणवीस यांनी राज्यात अनेकावर दबाव टाकले, मराठा नेत्यांना त्रास दिला आहे. सांस्कृतिक मंत्रालय मुंबईसह इतर कार्यक्रमाला पैसे देतात मग छत्रपती संभाजी महाराज यांच्या नाटक प्रयोगाचे का पैसे देत नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.

नाटक प्रयोगात माझे चेक नाही, पैसाचा हिशोब माझ्याकडे नाही, तरीही मला यात अडकवले जात आहे. यात न्यायालयाने आम्हाला मार्ग काढुन दिला पाहिजे. राज्यात अनेक प्रकरणे आहेत, त्यांना काही होत नाही, त्यांना वेळ मिळतो आम्हाला मुद्दाम त्रास दिला जात आहे. न्याय देवतावर आमचा विश्वास आहे.

फडवणवीस हे षडयंत्र रचुन मला जेलमध्ये टाकणार आहे, जेलमध्ये माझा घातपात होऊ शकतो. असे झाले तर राज्यात भाजपा विरोधात समाजाने पेटुन उठावे, भाजपा वाईट पक्ष नाही, मात्र तो पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या इशारावर चालतो. निवडणूक मध्ये त्यांना जागा दाखवा, असे जरांगे यांनी सांगितले.

विधानसभा निवडणूकमध्ये आपल्या विचाराचे आमदार पाठवणे गरजेचे आहे. त्या करीता तयारीला लागा, आमदार प्रसाद लाड, आ. प्रविण दरेकर यांनी फडवणवीस यांच्या सल्ल्याने माझ्या विरोधात बदनामी करीता अभियान चालू केले आहे हे समाज बघत आहे. या वेळी आ. लाड, आ. दरेकर, उपमुख्यमंत्री फडवणवीस यांच्यावर मनोज जरांगे यांनी टिका केली.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडवणवीस, मंत्री शंभूराजे देसाई,शासनावर, तेरा ऑगस्ट पर्यत विश्वास आहे त्यांनी आरक्षण द्यावे कुणबी मराठा एक आहे, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी,मला राजकारण करायचे नाही मात्र आपल्याला न्याय, हक्कासाठी विधानसभेत आपल्या विचाराचे लोक पाठवावे लागणार आहे त्याची तयारी चालू करत आहे.

ठरल्याप्रमाणे सोलापुर येथुन 7 ऑगस्ट रोजी दौरा सुरु करत आहे. त्याची सांगता 13 ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे असे मनोज जरांगे यांनी सांगितले. उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे उपचार घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर कडे रवाणा झाले आहे.

संक्षिप्त

1) समाज म्हणेल त्याला निवडणूकीत पाडले जाईल मी समाजाच्या पुढे नाही.

2) आंदोलन मुळे समाजाच्या अडचणी सुटत आहे एक संघ व पाठीमागे उभे रहा, जेल मध्ये गेलो तरी मागे हटणार नाही.

3) 29 ऑगस्ट रोजी राज्यातील समाज बांधवांना बोलावुन विधानसभा निवडणूक मध्ये उभे राहायचे का पडायचे याचा निर्णय घेतला जाईल, पुढील दिशा ठरवली जाईल,ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार,

4) आम्हाला मुंबई बघायची आहे मुंबईला येण्यासाठी लवकरच निर्णय घेतला जाईल.

5) अंतरवाली सराटी येथे समाज बांधव यांची मोठी उपस्थिती,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT