Manoj Jarange Patil Sakal
मराठवाडा

Manoj Jarange Patil : अर्धवट आरक्षण मान्य नाही, महाराष्ट्रात सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या

मराठा समाजाला आवाहन आहे शांततेत आंदोलन करा आत्महत्या करू नका असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

दिलीप दखने

वडीगोद्री - मुंबई येथे आरक्षण बाबत बैठक झाली या बैठकीत मराठवाड्यात ज्याच्या कुणबी असल्याच्या नोंदी समितीला मिळाल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद मध्ये जाहीर केले हे अर्धवट आरक्षण आम्हाला मान्य नसल्याचे मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सांगितले.

जरांगे यांनी सोमवार (ता. 30) रोजी पत्रकार परिषद घेऊन हि माहिती दिली. वेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांनी जरांगे यांच्या सोबत फोनवर चर्चा करून समिती चे निर्णय जरांगे यांना सांगीतले.

या वर जरांगे यांनी सांगितले कि, मंगळवार (ता. 31) रोजी मुंबई येथे राज्यातील सर्व जिल्हाधिकारीना बोलवा व सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, मंत्रिमंडळ बैठकित निर्णय घ्या या शिवाय हे आंदोलन थांबणार नाही, मंत्रीमंडळ बैठित निर्णय घ्या शासनाला जो वेळ पाहिजे तो दिला आहे. तरही आरक्षण मिळाले नाही.

क्युरीपिटेशन तारीख पडु शकत नाही, शासनावर कसा विश्वास ठेवयाचा शिडी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आरक्षण बाबत काही बोलले नाही, शिर्डी मध्ये पंतप्रधान यांना सांगीतले नाही, पुरावे आहे आता आरक्षण द्या आंदोलनाचा तिसरा टप्पा चालू होणार आहे धोरणात या तातडीने समीतीचे कामकाज बंद करून आरक्षण द्या, मुंबईत चर्चा साठी शिष्टमंडळ जाणार नाही, पहिले शिष्टमंडळाने फुटले, ते आता बाहेर येत नाही.

मराठा समाजाला आवाहन आहे शांततेत आंदोलन करा आत्महत्या करू नका असे मनोज जरांगे यांनी सांगितले. उपोषणाच्या 6 व्या दिवशी हि मनोज जरांगे यांनी वैघकिय उपचार नाकारले. समाज बांधव व महीला यांनी पाणी घेण्यासाठी मोठा आग्रह जरांगे यांना केला तेव्हा विनंती चा मान ठेवुन दोन घोट पाणी जरांगे यांनी घेतले. या वेळी जरांगे यांना अश्रू अनावर झाले डोळ्यात पाणी आले.

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी घेतली भेट

जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी अंतरवाली येथे मनोज जरांगे यांची सोमवार ता.30 रोजी भेट घेतली व चर्चा केली.

मनोज जरांगे पाटील यांनी पाणी घ्यावे, वैघकिय उपचार घ्यावे असी विनंती करण्यासाठी आलो होतो. मराठा समाज आरक्षण बाबत सर्व माहिती शासनाला कळवलि जात आहे. दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत लवकरच प्रकिया राबवली जाईल

- श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हाधिकारी ,जालना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

SCROLL FOR NEXT