Maratha Reservation Manoj Jarange-Patil Rally Disabled Maratha Persons esakal
मराठवाडा

'मी पायानं अपंग असलो, तरी मराठा आरक्षण मिळणं महत्त्वाचं'; पोलिसांनी गाड्या अडविल्याने अपंगांची 3 किलो मीटरपर्यंत कसरत

Maratha Reservation Manoj Jarange-Patil Rally : छत्रपती संभाजीनगरात आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडको बस स्थानक ते क्रांती चौक शांतता रॅली काढण्यात येणार आहे.

नवनाथ इधाटे

कोलते पायाने अपंग असल्याने सिडको बस स्थानक गाठेपर्यंत त्यांना मोठी कसरत करावी लागली.

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मराठा नेते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या नेतृत्वाखाली सिडको बस स्थानक ते क्रांती चौक दरम्यान महाशांतता रॅलीचे आयोजन केले आहे. त्यामुळे जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल होत आहेत.

फुलंब्री, सिल्लोड, हडको परिसरातून येणाऱ्या समाज बांधवांचे वाहन टीव्ही सेंटर सिग्नल (TV Center Signal) परिसरात अडविल्याने त्याच भागात आपले वाहन लावून तब्बल तीन किलो मीटरचा पायी टप्पा अपंगांनी गाठला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात शनिवारी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडको बस स्थानक ते क्रांती चौक शांतता रॅली काढण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव आज सकाळपासूनच शहरात दाखल होत होते.

दुपारी बारा वाजेच्या दरम्यान फुलंब्री तालुक्यातील रिधोरा देवी येथे राहणारे अमोल कोलते यांचे वाहन टीव्ही सेंटर परिसरातच पोलिसांनी अडकल्याने त्यांनी त्या भागात असलेल्या मोकळ्या जागेत वाहन लावले. त्यानंतर टीव्ही सेंटर ते सिडको बस स्थानक असा तब्बल तीन किलोमीटरचा पायी प्रवास अमोल कोलते यांनी केला. कोलते पायाने अपंग असल्याने सिडको बस स्थानक गाठेपर्यंत त्यांना मोठी कसरत करावी लागली. अमोल कोलते यांच्यासह मोठ्या प्रमाणात आणखीही अपंग व महिलांना हा पायी येण्याचा टप्पा मोठा मोठा होता.

त्यानंतर सकल मराठा समाज बांधव संदीप बोरसे, किशोर बलांडे, बाळासाहेब थोरात, पुंडलिक जंगले, वरून पाथ्रीकर, नंदू मोटे, रमेश गायकवाड आदींनी या परिसरात जाऊन पोलिसांना सदरील महा शांतता रॅलीत येणाऱ्या वाहनांना सिडको बस स्थानक पर्यंत येण्यासाठी विनंती केली. त्यानंतर सदरील वाहने सिडको बस स्थानकापासून नियोजित पार्किंग स्थळी लावले जाईल. असे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन सदरील वाहन सिडको बस स्थानक पर्यंत जाऊ दिले. त्यामुळे अपंग व महिलांचा पायी तीन किलोमीटरचा मोठा टप्पा वाचला आहे. जिल्हाभरातून जळगाव रस्त्यावरून येणारे वाहन बस स्थानक पर्यंत येऊन मराठा समाज बांधवांना सोडल्यानंतर सदरील वाहन नियोजित असणाऱ्या पार्किंग स्थळी रवांना होत होते.

टीव्ही सेंटर सिग्नलवर पोलिसांनी वाहन अडविल्याने तेथील मोकळ्या जागेत वाहन लावले. त्यानंतर तिथून सिडको बस स्थानक पर्यंत तीन किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला. मी पायाने अपंग असलो तरी मराठा आरक्षण मिळणे महत्त्वाचे वाटते. त्यामुळे तासभरात सिडको बस स्थानक गाठले.

-अमोल कोलते, अपंग बांधव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT