Maratha Reservation Sakal
मराठवाडा

Maratha Reservation : अंतरवाली सराटीतील आंदोलनाला यश; मुख्यमंत्र्यांच्या अधिसूचनेनंतर पाच महिन्यांच्या लढ्याची सांगता

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोनवेळा बेमुदत उपोषण केल्यानंतर आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेअंती दोन वेळा मुदत देऊनही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही.

सकाळ वृत्तसेवा

Jalna News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोनवेळा बेमुदत उपोषण केल्यानंतर आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेअंती दोन वेळा मुदत देऊनही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही.

त्यामुळे पाच महिने आंदोलनाची धग कायम ठेवत मनोज जरांगे आणि समाजबांधव यांनी मराठा आरक्षणासाठी आखलेली मुंबई मोहीम फत्ते केल्याने मराठवाड्यासह राज्यात जल्लोष सुरू आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील आंदोलनाने मराठा आरक्षण खेचून आणल्याचा मान अंतरवाली सराटीला मिळाला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण केले होते. या उपोषणादरम्यान पोलिस-आंदोलकांमध्ये धुमश्चक्री झाल्याने संपूर्ण राज्याचे अंतरवाली सराटी आणि मराठा आरक्षणाकडे लक्ष वेधले.

राज्यात पोलिस-आंदोलनकांमध्ये धुमश्चक्रीचे पडसादही उमटले होते. शिवाय राज्यातील मराठा समाजबांधव अंतरवाली सराटी हे गाव शोधत मनोज जरांगे यांच्या भेटीला लाखोंच्या संख्येने दाखल झाला होता.

विरोधकांसह सत्ताधारी राजकीय नेत्यांची अंतरवाली सराटीत रीघ लागली होती. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी येऊन मराठा आरक्षणाचे आश्‍वासन दिले.

राज्य सरकारला ४० दिवसांचा अवधी देत जरांगे यांचे पाहिल्या टप्प्यातील १७ दिवसांचे बेमुदत उपोषण स्थगित झाले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही मराठा आरक्षणाचा प्रश्‍न न सुटल्याने मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात २६ ऑक्टोबर रोजी पुन्हा उपोषण सुरू केले होते.

मंत्रिमंडळासह निवृत्त न्यायाधीशांबरोबर जाहीर चर्चा करून जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांचा अवधी दिला होता. मात्र, यादरम्यान आंदोलनाची धग कमी होऊ नये, यासाठी जरांगे यांनी राज्याचा पाच टप्प्यांत दौरा करून ठिकठिकाणी सभा घेतल्या.

तब्बल पाच महिने त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची धग कायम ठेवली. या पाच महिन्यांच्या आंदोलनानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी अंतरवाली सराटी येथून हजारो समाजबांधवांसह २० जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने कूच केले.

हा हजारोंचा जनसमुदाय मुंबईत लाखांमध्ये एकवटल्याने राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करत ज्यांच्या कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी आढळून आल्या त्यांच्यासह सगेसोयऱ्यांच्या मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला.

गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न अखेर मनोज जरांगे आणि जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील पाच महिन्यांच्या आंदोलनानंतर झालेल्या मुंबई मोहिमेनंतर निकाली निघाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण देण्याचा बहुमान अंतरवाली सराटीला मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT