Manoj Jarange Patil sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मागणी एक, दिले दुसरेच; पुढील आंदोलनाची दिशा आज ठरणार

‘आमची मागणी एक, दिले दुसरेच. शासनाने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर केले.

सकाळ वृत्तसेवा

अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि.जालना) - ‘आमची मागणी एक, दिले दुसरेच. शासनाने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर केले. शासनाचे हे आरक्षण ज्याला पाहिजे त्यांनी घ्यावे. सगेसोयऱ्यांबाबत कायद्याची अंमलबजावणी आणि मराठा समाजाला ओबीसीमधून टिकणारे आरक्षण द्यावे, ही आमची मूळ मागणी आहे. आमच्या मागणीप्रमाणे आरक्षण द्यावे’, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी मांडली.

शासनाच्या निर्णयाचे जरांगे यांनी स्वागत केले असले, तरी ते आपल्या मागण्या व उपोषणावर ठाम आहेत. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवारी (ता. २१) दुपारी अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे राज्यातील समाजबांधवांची बैठक बोलावली आहे. शासनाकडून दहा टक्के आरक्षणाचा निर्णय होताच जरांगेंनी सलाईनसाठी हातावर टोचलेली सुई काढून टाकली. त्यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस होता. मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

विधिमंडळाचे अधिवेशन संपताच अंतरवाली सराटीत झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे म्हणाले, ‘‘दहा टक्के आरक्षण भविष्यात टिकेल का, याची खात्री नाही. ज्या मागणीसाठी उठाव केला नाही ती मागणी मंजूर करणे, ज्यासाठी आंदोलन केले जात आहे आणि ते मिळत नसले तर शासनाकडून समाजाची चेष्टा व फसवणूक आहे. ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी मराठ्यांनी आंदोलन उभे केले आहे. मराठ्यांची मागणी एक आणि तुम्ही वेगळेच देत असाल, तर तुम्ही मराठा आरक्षणविरोधी आहात’.

‘सरकारने दिलेल्या आरक्षणाचा फायदा फार कमी लोकांना होणार आहे. ओबीसीतून टिकणारे आरक्षण द्यावे, ही कोट्यवधी मराठ्यांची मागणी आहे, याकडे शासनाने गांभीर्याने बघावे. ज्यांच्याकडे नोंदी नाहीत, त्यांना ‘सगेसोयऱ्या’चा कायदा करू, असे सरकारने साडेतीन महिन्यांपूर्वी सांगितले होते. सगेसोयऱ्यांबाबत सरकारने अधिसूचना काढली. त्यावर अंमलबजावणीचा निर्णय अद्याप झाला नाही.

सरकारला वेळ देऊनही निर्णय का होत नाही? आता वेळ वाढवून मिळणार नाही. अधिसूचनेवर प्राप्त झालेल्या हरकतींची छाननी करण्यासाठी शासनाकडे मोठी यंत्रणा, कर्मचारी आहेत. हरकतींवर काय करायचे, हा शासनाचा प्रश्न आहे’, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

शासनाला महत्त्वाचे कोण?

आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. त्यावर कार्यवाही होताना दिसत नाही. हैदराबादचे गॅझेट का स्वीकारले जात नाही? सरकारला तीन लोक महत्त्वाचे की साडेपाच-सहा कोटी लोक महत्त्वाचे आहेत, असा प्रश्नही जरांगेंनी उपस्थित केला. विशेष अधिवेशनात कोणते मंत्री, आमदारांनी समाजासाठी भूमिका मांडली, हे लवकरच कळणार आहे. त्यावर समाज योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

IND vs SL 1st Test: लोकेश राहुलची पहिल्या कसोटीतून माघार? दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास विलंब; नेमकं काय घडलं?

ICC 2027 World Cup Date: गांधी जयंतीला सुरू होतोय वर्ल्ड कप अन् फायनल...! नवीन फॉरमॅट, नवीन चुरस; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Marathi News Live Updates : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT