maratha youth fasting on mobile tower for Maratha Reservation sakal
मराठवाडा

Maratha Reservation : तीनशे फूट उंचीच्या मोबाईल मनोऱ्यावर चढून मराठा तरुणाचे बेमुदत उपोषण सुरू

300 फुट उंचीच्या मोबाईल टॉवरवर चढून बुधवारी (ता 25) मराठी तरुणाने मराठा आरक्षणासाठी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली.

संतोष शेळके

करमाड - शेकटा (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथील जालना महामार्गालगतच्या बीएसएनएल कंपनीच्या 300 फुट उंचीच्या मोबाईल टॉवरवर चढून बुधवारी (ता 25) सुधाकर शिंदे या मराठी तरुणाने मराठा आरक्षणासाठी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. आरक्षणाच्या पहिल्या टप्प्यातही या तरुणाने याच जागेवर सलग 30 तासांचे आमरण उपोषण केले होते.

महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी श्री शिंदे यांचे हे आमरण उपोषण आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सुरू केलेले हे आंदोलन आता जोपर्यंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचा जीआर निघत नाही तोपर्यंत माघार नाही असे यावेळी उपोषणकर्ते सुधारकर शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी त्यांनी मराठा बांधवांना साद घालताना शेकटा नगरीत जास्तीत बांधवांनी एकत्रित येऊन सरकारला 'एक मराठा, लाख मराठा' ही ताकद आंदोलनाच्या माध्यमातून दाखवण्यासाठीची ही योग्य वेळ असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT