Maratha Reservation 
मराठवाडा

Maratha Reservation: मराठा तरुणाचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न, चिठ्ठीत उघड केले 'कारण'

आनंद इंदानी

Maratha Reservation: बदनापूर (जिल्हा जालना): मराठा आरक्षण मिळत नसल्याने नैराश्यात आलेल्या गोकुळवाडी (ता. बदनापूर) येथील युवकाने आपल्या राहत्या घरी रविवारी (ता. २९) रात्री विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत तसा उल्लेख देखील केला आहे.

निखिल पंडित गाडेकर (वय २२) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याचा व्यवसाय शेती असून त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मराठा समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्यामुळे समाजाला आरक्षणाची नितांत आवश्यकता आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्याने औषध प्राशन करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले होते.

दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तातडीने त्यास प्रारंभी बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा सल्ला दिला. दरम्यान, त्यास खासगी वाहनाने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले आहे. सुदैवाने त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT