vinayak mete
vinayak mete vinayak mete
मराठवाडा

मराठा क्रांती संघर्ष मोर्चा निघणारच; परवानगी असो वा नसो - विनायक मेटे

दत्ता देशमुख

बीड: मराठा समाजाचे आरक्षण (maratha reservation) व इतर मागण्यांसाठी शनिवारी (ता. पाच) निघणाऱ्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या (maratha kranti sangharsh morcha) तयारीला मिळणारा प्रतिसाद पाहून अनेकांच्या पोटात गोळा उठत आहे. अफवा पसरविल्या जात आहेत, समाजासाठी काडीचेही योगदान नसलेले विरोध करीत आहेत. पण, प्रशासनाने परवानगी दिली किंवा नाही दिली तरी मोर्चा निघणारच, असा निर्धार शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे (vinayak mete) आणि माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील (nare यांनी व्यक्त केला.

शनिवारी सकाळी ११ वाजता श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथून मोर्चा निघून शहरातील प्रमुख रस्त्यांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचेल. हा मोर्चा बोलका असेल, सरकारच्या अपयशाची पोलखोल करणारा असेल, असे विनायक मेटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. नरेंद्र पाटील म्हणाले, २०१६ मध्ये जसे सरकार विरोधात मोर्चे निघाले त्याच प्रकारचा हा मोर्चा असेल. ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही लोकं विनायक मेटे काढत असलेल्या समाजाच्या मोर्चाला विरोध करीत आहेत. हा विरोध आपल्याला पटलेला नाही. सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. सत्तेची लाचारी सोडून समाजासाठी एकत्र येण्याचे आवाहनही नरेंद्र पाटील यांनी केले.

दरम्यान, काँग्रेसला कायम मराठा समाजाचा आकस आहे. दिवंगत अण्णासाहेब पाटील यांची आत्महत्या नाही तर काँग्रेसच्या धोरणांमुळे खूनच म्हणावा लागेल, असे विनायक मेटे म्हणाले. मोर्चाला विरोध करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. अशोक चव्हाणांच्या नादी लागून एक दिवस काँग्रेसचे विसर्जन होईल, असेही विनायक मेटे म्हणाले. चव्हाणांनी समोर यावे आपण शंभर चुका सांगू, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, नरेंद्र पाटील दोन दिवसांपासून जिल्ह्यात असून, मोर्चातही ते सहभागी होणार आहेत. मोर्चाला उपस्थितीचे आवाहन करीत त्यांनी अनेक ठिकाणी बैठका आणि पत्रकार परिषदाही घेतल्या आहेत. मोर्चा निघणारच आणि यशस्वीही होणार असेही नरेंद्र पाटील म्हणाले. राज्याला या मोर्चाने नवी दिशा मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT