maratha reservation ordinance cancelled sanjay shirsat demand to govt sakal
मराठवाडा

Maratha Reservation : आरक्षणाबाबतचा अध्यादेश रद्द करा; अधिवक्ता संजय शिरसाट यांची सरकारकडे मागणी

एखाद्या जातीला मोर्चे, आंदोलनातून आरक्षण दिले जात नाही तर त्यांचे राजकीय, आर्थिक, सामाजिक चाचण्यांतून मागासलेपण सिद्ध झाल्यावर आरक्षण दिले जाते.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : एखाद्या जातीला मोर्चे, आंदोलनातून आरक्षण दिले जात नाही तर त्यांचे राजकीय, आर्थिक, सामाजिक चाचण्यांतून मागासलेपण सिद्ध झाल्यावर आरक्षण दिले जाते. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाने काढलेले अध्यादेशाचा मसुदा कायदाबाह्य असल्याचे सांगून हा मसुदा रद्द करावा, अशी मागणी अधिवक्ता ॲड. संजय शिरसाट यांनी केली आहे.

या मसुद्याचे जर शासन निर्णयात रूपांतर झाले तर ओबीसींच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलक मुंबईत धडकल्यानंतर शासनाने त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने नियमात दुरुस्ती करण्यासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला.

त्या अनुषंगाने आरक्षणविषयक प्रकरणे हाताळणारे ॲड. शिरसाट यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन वरील मागणी केली. ॲड. शिरसाट म्हणाले, जातीनिहाय आरक्षण देताना संबंधित जातीचे सामाजिक, राजकीय व आर्थिक या तीन चाचण्यांमध्ये मागासलेपण सिद्ध झाले पाहिजे, तसे झाले तर आरक्षणाचा विचार केला जातो.

शासनाने प्रसिद्ध केलेला नियमातील दुरुस्तीसंदर्भातील मसुदा जाहीर करताना या ट्रीपलटेस्ट केल्या नाहीत. त्यामुळे हा मसुदा कायदाबाह्य आहे. सध्या हा मसुदा असून १६ फेब्रुवारीपर्यंत यावर हरकती, सूचना मागवल्या आहेत. शासनाकडे आम्ही हरकती नोंदवणार आहोत. यानंतरही जर या मसुद्याचे शासन निर्णयात रूपांतर झाले तर ओबीसींच्यावतीने माझ्याकडे अनेक संघटनांनी संपर्क साधला आहे. त्यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान दिले जाईल.’’

शासनाने स्पष्टीकरण द्यावे

आधीच ओबीसींमध्ये लहान मोठ्या ५१० जाती आहेत. त्यांना १९ टक्के आरक्षण आहे. त्यात आणखी एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या जातीची भर टाकली तर मूळ ओबीसींच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी ॲड. शिरसाट यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT