manoj jarange Esakal
मराठवाडा

Maratha Reservation : अंतरवाली सराटी येथे उपोषण स्थळी नियोजन सभा संपन्न,राज्यातील उपोषण स्थळी जरांगे भेट देणार

आरक्षण देण्यासाठी शासनाला 30 दिवसाचा वेळ व 10 दिवस शिल्लक दिले आहे त्यामुळे त्यांनी लवकर निर्णय घेऊन आरक्षण द्यावे

दिलीप दखने

वडीगोद्री - मराठा समाजाला आरक्षण मिळावे करीता शासनाला 30 दिवसाचा वेळ दिला आहे. हि मुदत 14 आक्टोंबर रोजी संपत आहे या दिवशी शासनाच्या आदेशाची वाट पाहाणे व पुढील नियोजन करणे यासाठी राजस्तरीय सभेचे नियोजन करण्यात येत असल्याचे अंतरवाली सराटी येथे उपोषण स्थळी मनोज जरांगे यांनी शनिवार ता.23 रोजी सांगीतले.या ठिकाणी गोदाकाठावरील 142 गावातील मराठा समाज बांधवांचा मेळावा जरांगे यांच्या उपस्थिती मध्ये घेण्यात आला.या नियोजन मेळाव्याला मोठ्या प्रमाणात नागरीकांची उपस्थिती होती.

या वेळी बोलतांना जरांगे यांनी सांगितले कि.मराठा आरक्षण करीता अंतरवाली सराटी येथे आमरण व साखळी उपोषण होत आहे. शासनाने तिस दिवसाची मुदत मागतली ती मुदत दिली व आमरण उपोषण थांबवले आता साखळी उपोषण करण्यात येत आहे.

शासनाला जी मुदत दिली ती 14 आक्टोंबर रोजी संपत आहे . अंतरवाली सराटी परीसरात या भव्य दिव्य सभेचे नियोजन करण्यात येणार आहे या करीता सभेच्या जागेची पाहणी करण्यात येत आहे.या ठिकाणी याच दिवशी राज्यभरातील मराठा बांधवांना बोलावुन नियोजन सभा घेण्यात येणार आहे. या सभेत तिस दिवसा नंतर शासनाने काय निर्णय घेतले ,

कोणते जी.आर.आले, शासनाची पुढील दिशा काय असणार व पुढे काय निर्णय घ्यायचा आहे हि संपुर्ण माहिती नागरीकांना देण्यात येणार आहे. 30 दिवसा नंतर शासनाकडून मध्यस्थी करण्यासाठी जे कोणी येतील त्यांना बंदी घालण्यात येणार आहे.

कोणालाही ( लोकप्रतिनिधी/शासकीय अधिकारी) यांना अंतरवाली येथे सभास्थानी येता येणार नाही त्यांना बंदी घातली जाईल असे जरांगे पाटील यांनी सांगितले. आरक्षण देण्यासाठी शासनाला 30 दिवसाचा वेळ व 10 दिवस शिल्लक दिले आहे त्यामुळे त्यांनी लवकर निर्णय घेऊन आरक्षण द्यावे , राज्यात सध्या ज्या ज्या ठिकाणी उपोषण अथवा साखळी उपोषण चालू आहे त्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी मनोज जरांगे व सहकारी मंडळ आता भेट देणार आहे त्या गावाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे व त्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सांगीतले.शनिवारी अंतरवाली सराटी येथे साखळी उपोषण स्थळी रेणापुरी व नालेवाडी या गावातील नागरिकांनी जागर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT