Maratha Reservation sambhaji bhide 
मराठवाडा

Maratha Reservation: गुरुजी स्वत: आल्याने आणखी बळ मिळालं; जरांगे पाटील यांची संभाजी भिंडेंच्या उपस्थितीवर प्रतिक्रिया

कार्तिक पुजारी

जालना- मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अद्याप सुरु आहे. आज दुपारी दोन वाजता ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. याआधी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आले होते. भिडेंनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना संभाजी भिडेंचे कौतुक केले.

आंदोलनाला पाठिंबा द्यायला गुरुजी आलेत आमच्यासाठी आंनदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. आम्ही गोरगरिबांची लेकरं आहोत. आमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकायला आणि आम्हाला आशीर्वाद रुपी बळ द्यायला ते आले आहेत. हा लढा जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत छातीठोकपणे आमच्यासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.

आमच्यासारख्या पोरांना-तरुणांनाही लाजवेत अशा प्रकारचे शब्द त्यांनी यावेळी वापरले. त्यामुळे मला आणखी बळ मिळालं आहे. आंदोलनामध्ये माझा जो हिरमोड झाला होता, त्यांच्या येण्याने मला आणखी शक्ती आली आहे. या आंदोलनात, माझ्या आंदोलनात स्वत: प्रत्यक्ष गुरुजी आले आहेत. त्याबाबत आपण सर्वांनी त्यांच स्वागत करु, असं जरांगे पाटील म्हणाले.

संभाजी भिडे काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे शब्द फिरवनारे नाहीत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ,शब्द पाळून घेण्याची जबाबदारी माझी आहे .आपला आग्रह सत्य आहे. उपोषण थांबवा ,शंका घेऊ नका आम्ही सोबत आहोत, असे संभाजी भिडे यांनी सांगितलं. आरक्षण मिळेपर्यंत तुमच्या सोबत आहे. तुमची लढाई यशस्वी होणार. तुम्ही मागे वळून पहायचे नाही, असे संभाजी भिडे यांनी सांगितलं.

शासनाने मुंबईत सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली त्यांची माहिती देण्यासाठी आलो आहे. शासन सकारात्मक भूमिका घेत आहे. सर्वांनी ठराव केला जी भूमिका आपली आहे त्यावर शासन विचार करत आहे. शासन निर्णय घेतला गुन्हे मागे घेतले जात आहेत त्याची प्रक्रिया सुरू , अशी माहिती त्यांनी जरांगेंना दिली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway: मिसिंग लिंकनंतर पहिल्यांदाच द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गर्दी

Pune BJP Woman Leader: पुण्यातील महिला भाजप नेत्याचं निधन, वयाच्या ६०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Highway Accident: मुंबई बंगळूर हायवेवर भीषण अपघात, टाटा अल्ट्रोजचा चुराडा; मुंबईच्या दोघांचा मृत्यू, १२ जण जखमी

पद्मिनी कोल्हापूरे-प्रीती सप्रू रस्त्यावरच कचाकचा भांडल्या; संतापलेल्या पोलिसांनी सुनावलं, Viral Video

Mongoose satire story : मुंगूस आणि पाळलेला माणूस

SCROLL FOR NEXT