Ashok Chavhan Sakal
मराठवाडा

Ashok Chavhan : 'अधिवेशन बोलवा, कायदा बदला पण मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा'; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

लाठीहल्ला का केला? शासनातील लोकं आली असती, चर्चा झाली असती तर कदाचित सर्व गावकऱ्यांनी समजून घेतलं असतं.

दत्ता लवांडे

जालना : जालन्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज आणि गोळीबार केल्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यानंतर अनेक नेत्यांनी या आंदोलकांच्या भेटी घेतल्या असून "कायदा बदला पण मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा" अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

अंतरवाली सराटी येथील आंदोलकांची आज रात्री ९ वाजता उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. "आपल्या गावात अमानुष लाठीहल्ला झाला. बुलेट झाडण्यात आल्या. दुर्दैवाची बाब म्हणजे शांततेत आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटलांवर अन्याय करण्यात आला. लाठीहल्ला का केला? शासनातील लोकं आली असती, चर्चा झाली असती तर कदाचित सर्व गावकऱ्यांनी समजून घेतलं असतं." असं चव्हाण म्हणाले.

"आम्ही महाराष्ट्रात सामील झालो तेव्हा देखील संवेदनशीलपणा दाखवला. आम्ही नेहमी लाठ्या खाव्या का? आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केला. संसदेने जे विशेष अधिवेशन बोलावले आहे त्यामध्ये हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे. वाटल्यास कायद्यामध्ये बदल करा पण मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा. 'वन नेशन वन इलेक्शन'चा मुद्दा ताजा असताना मला वाटते 'व्हाट अबाऊट आरक्षण?'... येवढाच आमचा मुद्दा आहे. लोकांचा अंत पाहू नका. आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे." असंही चव्हाण यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT