Maratha Reservation Protest 
मराठवाडा

भाजपचे संकटमोचक गेले, राणे गेले पण जरांगे पाटील मागण्यांवर ठाम! म्हणाले, "मेलो तरी चालेल ५ कोटी मराठे सुखी राहतील"

Sandip Kapde

Maratha Reservation Protest: भाजप नेते गिरीश महाजन आणि आमदार निलेश राणे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरंगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र जरांगे पाटील त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत.

पोलिसांनी गोळीबार केल्याचा पुरावा जरांगे पाटलांनी भाजप नेत्यांना दिला. यावेळी पुरावा म्हणून काही बुलेट देखील त्यांनी दाखवल्या. पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचे गिरीश महाजन म्हणाले.

जरांगे पाटील गिरीश महाजन यांना म्हणाले, "आमच्या पोरांना अटक केली. गंभीर गुन्हे दाखल केले. जबाबदार पोलिसांना निलंबित करा. तुम्ही आरक्षण देत नाही. साधा बडतर्फ करण्याचा विचार होईना. आमचे डोळे फोडले, आमच्या आई-बापांना हाणलय. तुमचे पण ते आई-बाप आहेत. मराठवाड्यातील मराठ्यांना न्याय द्या. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्ही अध्यादेश काढा मी आंदोलन मागे घेतो."

मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे, यासाठी काही प्रक्रिया नसते, असे जरांगे पाटील म्हणाले. यावर गिरीश महाजन म्हणाले हे कोर्टात टिकणार नाही थोडा वेळ द्यावा. चर्चा करुन मार्ग काढावा लागेल. राज्यातील अनेक प्रश्न आम्ही सोडवले. यावर पाटील म्हणाले, मराठ्यांचा प्रश्न सोडवला नाही. दोन दिवसात सर्क्युलर द्या उपोषण मागे घेतो.

"आमच्या पोरांवर गुन्हे दाखल केले. ते मागे घ्या. पोलिसांना निलंबित करा. आमचं पूर्वीचं आरक्षण आहे ते द्या, याला वेळेची आवश्यकता नाही. १ जून २००४ चा जीआर आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे. तो लागू करा. लवकर निर्णय घ्यायचा नसेल महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आरक्षण द्या. मी मेलो तरी चालेल ५ कोटी मराठे सुखी राहतील. एका जीवाने काही फरक पडणार नाही," असे जरांगे पाटील म्हणाले. (Latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT