maratha reservation protest update beed 57 buses broke into 70 lakh loss marathi news Sakal
मराठवाडा

Beed Maratha Reservation : बसस्थानाकत शिरुन फोडल्या ५७ बस; ७० लाख रुपयांचे नुकसान

विविध नेत्यांचे घर, बंगले व पक्षांचे कार्यालये तसेच हॉटेलच्या तोडफोडीनंतर तब्बल ५७ बस फोडण्यात आल्या

सकाळ वृत्तसेवा

बीड : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, यासाठी सुरु असलेले आंदोलन सोमवारी (ता. ३१) हाताबाहेर गेले. विविध नेत्यांचे घर, बंगले व पक्षांचे कार्यालये तसेच हॉटेलच्या तोडफोडीनंतर तब्बल ५७ बस फोडण्यात आल्या. वास्तविक बससेवा बंद ठेवलेली असताना स्थानकात लावलेल्या या बसच्या सर्व काचा फोडल्या आहेत. यात महामंडळाचे ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सोमवारी आंदोलकांनी अगोदर शासकीय कार्यालयांना टाळे ठोकले. त्यानंतर सुभाष रोडवर दगडफेक करुन व्यापारपेठ बंद केली व शुभम ज्वेलर्स फोडले. यानंतर माजी बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवनला आग लावण्यात आली. यानंतर मंत्री मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे शहरातील कार्यालय तसेच त्यांचे व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नगर रोडवरील बंगल्यासमोरील गाड्या जाळण्यात आल्या.

याच काळात भाजप, शिवसेना कार्यालयांचीही तोडफोड करण्यात आली. तसेच शिवसेनेचेही कार्यालय जाळण्यात आले. काही काळाने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात आल्यानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, याच काळात बसस्थानकात उभ्या असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तब्बल ५७ बस फोडण्यात आल्या.

शनिवारी रात्री बस जाळल्यामुळे मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील आठही आगारांच्या ४५० बस एकाच जागी उभ्या आहेत. बीड आगाराच्या बस येथील बसस्थानकात उभ्या होत्या. समोर बॅरिकेट्स लाऊन खासगी सुरक्षारक्षक व पोलिस दिवसभर थांबून होते. तरीही आंदोलकांनी रात्रीच्या वेळी आतमध्ये जाऊन सर्वच बसच्या मागच्या पुढच्या आणि बाजूंच्या काचा फोडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT