Sopan Satpute sakal
मराठवाडा

Maratha Reservation : पाटील मला माफ करा. माझ्या लेकरांना आणि समाजाला आरक्षण द्या’; चिठ्ठी लिहून संपविले जीवन

मराठा आरक्षणासाठी ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रांजणगाव शेणपुंजी येथे घडली.

सकाळ वृत्तसेवा

वाळूज - मराठा आरक्षणासाठी ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. सोपान दशरथ सातपुते (वय ४०, रा. एकलहेरा, ता. गंगापूर, ह.मु. रांजणगाव शेणपुंजी) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांना त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडल्याने त्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

सोपान सातपुते हे रांजणगाव शेणपुंजीत श्रीरामनगरातील अशोक शेजूळ यांच्या घरात भाड्याने राहत होते. सोबत पत्नी ज्योती (वय ३५), मुलगा ऋषीकेश (१६) व मुलगी कीर्ती (१२) असा त्यांचा परिवार आहे. घटनेची माहिती वाळूज औद्योगिक वसाहत परिसर पोलिसांना देण्यात आली.

यावरून पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहायक फौजदार गोरखनाथ कडू, बाबूराव पद्देवाड, प्रशांत सोनवणे, ज्ञानेश्वर चौभे, कल्याण खामकर आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वाळूज औद्योगिक वसाहत परिसर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.

‘माझ्या लेकरांना आणि समाजाला आरक्षण द्या’

पोलिसांना सोपान सातपुते यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीमध्ये ‘जय शिवराय, जरांगे पाटील मराठा आरक्षण मिळणार आहे का? शेतात पिकत नाही. नोकरी नाही. समाजाला सरकार खेळवत आहे. पाटील मला माफ करा. माझ्या लेकरांना आणि समाजाला आरक्षण द्या’. तर पत्नी ज्योती यांना उद्देशून ‘ज्योती, मला माफ कर. नाना, दादा व दीदीला सांभाळा.’ पाटील आरक्षण घ्या. तुमचाच सोपान... जय शिवराय’ असा मजकूर चिठ्ठीत लिहून ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT