Manoj Jarange Patil  Sakal
मराठवाडा

Maratha Reservation : माझा जिव गेल्यावर सरकार राहील का...? - मनोज जरांगेंचा शासनाला गंभीर इशारा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवद्र फडणवीस, अजित दादा तुम्हाला वेळ नाही, अजित पवार फक्त भुजबळांना वेळ देतात, दाखल गुन्हे वापस घेतले जात नाहीत.

दिलीप दखने

वडीगोद्री - मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न तातडीने मार्गी लावा, नाहीतर मराठा समाज राज्यात आपली एक हि सभा होऊ देणार नाही, मुख्यमंत्री शिंदे तुम्ही मराठा समाजाची फसवणूक करता, अध्यादेश व मसुदा, सगे सोयरे बाबत निर्णय होत नाही, अधिवेशन त्वरित बोलवले जात नाही, कायदा पास होत नाही, माझा जिव गेल्यावर सरकार राहील का? असा गंभीर इशारा मनोज जरांगे यांनी शासनाला दिला आहे.

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे मंगळवार ता. 13 रोजी पत्रकार परिषद घेऊन शासनावर गंभीर टोकाची टिका केली. जरांगे हे शनिवार ता. 10 पासून आमरण उपोषण करत असुन, मंगळवार ता. 13 रोजी उपोषणाचा चौथा दिवस आहे.

या वेळी बोलताना जरांगे यांनी सांगितले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवद्र फडणवीस, अजित दादा तुम्हाला वेळ नाही, अजित पवार फक्त भुजबळांना वेळ देतात, दाखल गुन्हे वापस घेतले जात नाहीत, सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, माझा जिव गेल्यावर महाराष्टात दुसरी श्रीलंका होईल. शासनाने मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आला, तो का स्वीकारला नाही, त्यावर निर्णय होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

उपोषणाला पाठींबा देण्यासाठी सगळे मराठे आता अंतरवालीकडे येत आहे. याचा शासनाने विचार करावा, शिंदे साहेब तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय, आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठ्यासाठी वेळ नाही सर्वांनी बसवुन सगे सोयरेच्या कायद्याची अंमलबजावणी उद्या करा, आधी म्हणाले 15 तारखेला अधिवेशन घेऊ, आता म्हणतात 20 तारखेला अधिवेशन घेऊ, हे काय चालू आहे कळत नाही, माझा जीव गेल्यावर सरकार राहील का..? असा गंभीर इशारा मनोज जरांगे यांनी शासनाला दिला आहे.

उद्या बुधवार ता. 14 रोजी समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. उद्याचा बंद समाजाने शांततेत करावा आता सरकारने अंत पाहू नये, मला उठता, बसता येत नाही, शरीर साथ देत नाही, माझ्या छातीत दम लागतोय, मला खूप त्रास होतोय, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. या ठिकाणी माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

मालिकेत एकमेकांच्या तालावर नाचणाऱ्या सायली आणि प्रियाने चक्क कोळीगीतावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Gas Cylinder Scam : ‘LPG सिलेंडर हवा आहे का?’ अशा प्रकारच्या 'या' 5 व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध; एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे

Latest Marathi News Live Update : जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये घरगुती गॅसचा वापर

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

SCROLL FOR NEXT