Vinayakrao Patil sakal
मराठवाडा

Loksabha Election : विनायकराव पाटील यांच्यासह एक हजार मराठे नरेंद्र मोदींच्या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार!

हैद्राबाद गॅझेट स्वीकारून स्वतंत्र मराठा कुणबी आरक्षणाची मागणी.

अविनाश काळे

उमरगा - मराठवाड्यातील मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट स्वीकारून स्वतंत्र मराठा कुणबी आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विनायकराव यांच्यासह एक हजार मराठा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणशी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार केल्याची माहिती विनायकराव पाटील यांनी रविवारी (ता.१०) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

हैद्राबाद स्टेट स्टेट जनगणेत मराठवाड्यातील मराठा जातीची नोंद कुणबी मराठा होती. १९०९ मध्ये हैद्राबाद गॅझेट मध्ये मराठा जातीची कुणबी अशी नोंद आहे. काकासाहेब कालेलकर आयोगाने हैद्राबाद गॅझेट मध्ये मराठवाड्यातील मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयात समावेश केला आहे.

नागपूर करारानुसार मराठवाड्यातील मराठा समाजाचा अनुशेष भरून काढण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाच्या शिफारशीनुसार १ मे १९६० रोजी मराठवाडा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती मध्ये विनाअट सामील झाला. राज्यघटनेच्या ३७१ कलमानुसार मराठवाड्यातील संपूर्ण जातीचा ओबीसी मध्ये समावेश करून कायदा करून हैद्राबाद गॅझेट स्वीकारण्याचे नमूद करण्यात आले आहे.

या सर्व मागण्या ११ व १२ मार्च रोजी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात याव्यात अशी मागणी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना  निवेदनाद्वारे केल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.

दशमेश घाटावर उपोषणाचा इशारा

केंद्र व राज्य सरकारने घटनेच्या ३७१ कलमानुसार निजाम राजवटीतील ओबीसी असलेल्या मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा अन्यथा मराठवाड्यातील मराठा समाजाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात मराठा आरक्षणा करिता बलिदान दिलेल्या तरुणांचे अस्थि विसर्जन गंगा किनारी दशमेश घाटावर करण्यात येणार आहे. यानंतर आपण स्वतः गंगाजल घेऊन अमरण उपोषण करणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT