Suraj Jadhav Sakal
मराठवाडा

Maratha Reservation : आरक्षणासाठी पेटवून घेतल्याने तरुण गंभीर; वाचविण्याच्या प्रयत्नात आईही भाजली

मराठा आरक्षणासाठी अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रूक येथे एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना बुधवारी (ता. २२) सकाळी घडली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर/गोंदी - मराठा आरक्षणासाठी अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रूक येथे एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना बुधवारी (ता. २२) सकाळी घडली. वाचविण्याच्या प्रयत्नात त्याची आई देखील गंभीररीत्या भाजली असून, दोघांवर घाटी रुग्णालयात सुरु आहेत.

घाटीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी सांगितले की, सूरज गणेश जाधव असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे तर मंगल गणेश जाधव असे त्याच्या आईचे नाव आहे. सूरज हा ६० टक्के भाजला असून, मंगल जाधव या ३५ टक्के भाजल्या आहेत. दोघांवर घाटी रुग्णालयातील जळीत रुग्णांच्या वॉर्डात उपचार सुरू आहेत.

मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडील गणेश जाधव यांचे कपडेही जळाले. परंतु सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही, असे सांगण्यात आले. पाथरवाला बुद्रूक येथील बसस्थानक परिसरातील ते रहिवासी आहेत. प्रथम त्यांना उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

परंतु तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले असून गोंदी ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT