मराठा शिवसैनिक सेना 
मराठवाडा

हिंगोलीत मराठा शिवसैनिक सेना रस्त्यावर; ठाकरे, पवार आणि चव्हाण यांच्या निषेधार्थ जोडेमारो आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असून यापुढे आणखी आक्रमक आंदोलन केले जाणार असल्याचा इशाराही भिसे पाटील यांनी यावेळी दिला

राजेश दार्वेकर

हिंगोली : येथे मराठा आरक्षण प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात (Maratha reservation) योग्य भुमीका मांडली नसल्याचा आरोप करत मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने शनिवारी (ता. १५) सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, (Uddhav thakray, sharad pawar and Ashok chavan) मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. (Maratha Shiv Sainik Sena on the road in Hingoli; Jodemaro agitation against Thackeray, Pawar and Chavan)

येथील महात्मा गांधी चौकात झालेल्या या आंदोलनात मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक विनायक भिसे पाटील यांच्यासह पप्पू चव्हाण, पिंटू जाधव, संदीप डांगे, प्रा. बळीराम कल्याणकर, प्रा. विठ्ठल अंभोरे, अॅड. रमेश शिंदे, मधुकर ढवळे, असीफ पठाण, राजू पाटील, शुभम राजे, विश्वंभर पटवेकर, सोनू डांगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , मराठा मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सर्वाजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. सर्वोच्य न्यायालयात बाजू मांडण्यास राज्य सरकार कमी पडले आहे. राज्य शासनाने योग्य बाजू मांडली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यांचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आल्याचे विनायक भिसे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - हिंगोलीत ब्रेक दि चेन अंतर्गत सुधारित आदेश जारी; काय आहेत वाचा सविस्तर

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असून यापुढे आणखी आक्रमक आंदोलन केले जाणार असल्याचा इशाराही भिसे पाटील यांनी यावेळी दिला. दरम्यान, आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंडीत कच्छवे, उपनिरीक्षक नितीन केनेकर, साईनाथ अनमोड, शेख शकील, गजानन होळकर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांची सुटका केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT