beed.
beed. 
मराठवाडा

#MarathaKrantiMorcha बीड - काकासाहेब शिंदेंला जागोजागी श्रद्धांजली

सकाळवृत्तसेवा

बीड - मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. २४) पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. शहरांसह मोठ्या गावांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदचे आवाहन करत युवकांनी दुचाकी फेऱ्या काढल्या. तसेच, जागोजागा काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यत आली. 

बंदच्या कारणावरुन परळीत दोघांना जबर मारहाण झाली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. परळीत तणावपूर्ण शांतता असून कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मेगा भरती थांबवावी या मागणीसाठी बुधवारी (ता. १८) परळीत पहिला मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाला. त्यानंतर ठोस निर्णय होईपर्यंत माघार नाही असा पवित्रा घेत आंदोलनकर्त्यांनी सुरु केलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी (ता. २४) सातव्या दिवशीही सुरुच आहे. दरम्यान, या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले असून सोमवारी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी पात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतली. आंदोलनकर्त्यांनी निवेदनात जलसमाधीचा इशारा देऊनही प्रशासनाने गांभीर्य दाखविले नाही. त्यामुळेच काकासाहेब शिंदेला जीव गमवावा लागला. याच्या निषेधार्थ मंगळवारी राज्यात बंद पुकारण्यात आला. बंदला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. तालुक्यांच्या ठिकाणांसह आठवडी बाजारांची गावे आणि सर्कलच्या गावांमध्येही बंद पाळण्यात आला. व्यापारपेठा तसेच बस वाहतूक पुर्णपणे ठप्प आहे. नांदूरघाट व हिरापूर येथील आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आली. बंदचे आवाहन करत युवकांनी दुचाकी फेऱ्या काढल्या. तसेच, जागोजाग काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली. परळीत बंदच्या कारणावरुन दोघांना जबर मारहाण झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT