marathi language esakal
मराठवाडा

Marathi Classical Language: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यामागे बीडचा सिंहाचा वाटा; मराठीतल्या सर्वात पहिल्या ग्रंथाचा घेतला आधार

Beed News: बीड जिल्ह्यातलं अंबाजोगाई हे मुकुंदराजांचं जन्मगाव. तिथेच त्यांनी मराठीतला आद्यग्रंथ रचला. अंबाजोगाई शहरामध्ये मुकुंदराजांचं स्मारक आहे. ज्येष्ठ शेतकरी नेते अमर हबीब यांनी येथे मुकुंदराज कविता ग्रंथालय स्थापन केले आहे. मुकुंदराज यांचं स्मारक अंबाजोगाई शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे.

संतोष कानडे

Marathi Abhijat Bhasha: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केवळ मराठीच नाही तर पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेला हा जो बहुमान मिळाला, त्यामागे बीड जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे.

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देताना मराठीतल्या विवेकसिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी या ग्रंथांचा आधार घेतला आहे. अनेक थोरामोठ्यांनी काही दशपांकापासून यासाठी प्रयत्न केले होते, ते अखेर वास्तवात उतरले आहेत.

विवेकसिंधू हा ग्रंथ शके १११० मध्ये आद्यकवी मुकुंदराज यांनी रचला होता. हा ग्रंथ मराठी भाषेतला पहिला ग्रंथ आहे.

मुकुंदराज बीडच्या अंबाजोगाईचे

आद्यकवी मुकुंदराज हे मुळचे बीडचे. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई येथे मुकुंदराजांनी विवेकसिंधू या ग्रंथाची रचना केली. ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माच्या आधी मुकुंदराजांनी समाधी घेऊन ७५ वर्षे झाली होती. त्यांनी त्यांच्या विवेकसिंधू या ग्रंथामध्ये शंकराचार्यांच्या वेदांतावर निरुपणात्मक विवेचन केले. या ग्रंथामध्ये एकूण १८ ओवीबद्ध प्रकरणे आहेत. शिवाय त्यांनी परमामृत हा दुसरा मराठी ग्रंथ रचला.

अंबाजोगाईतच ग्रंथरचना

बीड जिल्ह्यातलं अंबाजोगाई हे मुकुंदराजांचं जन्मगाव. तिथेच त्यांनी मराठीतला आद्यग्रंथ रचला. अंबाजोगाई शहरामध्ये मुकुंदराजांचं स्मारक आहे. ज्येष्ठ शेतकरी नेते अमर हबीब यांनी येथे मुकुंदराज कविता ग्रंथालय स्थापन केले आहे. मुकुंदराज यांचं स्मारक अंबाजोगाई शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे.

मराठी भाषेचं विद्यापीठ कुठे होणार?

मराठी भाषेचं विद्यापीठ बीडच्या अंबाजोगाई येथे व्हावं, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु देवेंद्र फडणवीसांनी अर्थमंत्री म्हणून ९ मार्च २०२३ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अमरावती जिल्ह्याची घोषणा केली होती.

अमरावती जिल्ह्यातल्या रिद्धपूर येथे मराठी भाषेचं विद्यापीठ करण्याची घोषणा अर्थमंत्री फडणवीस यांनी त्यावेळी केली. यासह अनेक ठिकाणी नाट्यगृह, चित्रनगरींसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली होती.

असं असेल तर मग बीडचं काय? ज्या मुकुंदराज यांनी मराठीतला पहिला ग्रंथ रचला आणि त्यामुळेच जर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असेल तर त्या बीडवर नाराजी का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT