marathi news ashok chavhan shivsena bjp alliance
marathi news ashok chavhan shivsena bjp alliance  
मराठवाडा

डरकाळी फोडली तरीही शिवसेना भाजपसोबतच फरफटत जाईल - अशोक चव्हाण 

मधुकर कांबळे

औरंगाबाद - 'शिवसेना सरकारचा पाठींबा काढू शकत नाही, त्यांनी कितीही डरकाळी फोडली तरी त्यांचा हा फुसका बार असून ती अशीच भाजपबरोबर फरफटत जाईल. आम्ही पाठींबा काढू असे शिवसेनेने आतापर्यंत किती वेळा म्हटले असेल यामुळे आता लोकांनीही ते मोजणे सोडून दिले आहे,' अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर केली. 

औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे काँग्रेस पक्ष कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे मंगळवारी (ता. 30) आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, 'सध्या कायद्याचे राज्य राहिले नाही. आम्ही करु तो कायदा असे जंगल राज सुरु आहे. कोरेगाव भीमा येथील घटना जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र होते. मतांचे ध्रुवीकरण करणे आणि आपली वोट बँक पक्‍की करणे असाच सरकारचा दृष्टीकोन असून ही फार गंभीर बाब आहे. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा ज्वलंत प्रश्‍न आहे. मात्र सरकार याला गांभीर्याने घेण्याऐवजी कसलीच प्रतिक्रिया देत नाही. यवतमाळ येथे किटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. मात्र यासंदर्भातील अहवालात ठोस काहीच निष्पन्न झाल्याचे दाखवले गेले नाही.' एकप्रकारे फडणवीस सरकार जनतेवर विषप्रयोगच करत असल्याची टिका त्यांनी केली. पत्रकार परिषदेपुर्वी प्रशिक्षण शिबिरात त्यांनी सरकारवर टिका करताना लोकांशी देणे घेणे नसलेल्या या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. राज्यातील शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी सरकारकडे कसलाच कार्यक्रम नाही. उलट ते खड्ड्यात गेले आहेत. या दोन्ही सरकारांना फक्‍त विकासाची कसलीच काळजी नाही. त्यांना फक्‍त निवडणुकांचीच काळजी आहे. म्हणुनच लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्र घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे मत व्यक्‍त केले. 
 

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT