liver transplant
liver transplant 
मराठवाडा

औरंगाबादमध्ये पहिली यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

योगेश पायघन

औरंगाबाद : सिटीकेअर हॉस्पिटलला गुरूवारी (ता. 23) एक रुग्ण ब्रेनहॅमरेज झाल्याने दाखल करण्यात आला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाची संमती दिल्याने शुक्रवारी (ता. 24) बारा वाजता अवयव ऑर्गन रिट्रायव्हल सेंटर कमल नयन बजाज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्या रूग्णाला ब्रेनडेड घोषित करून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कायदेशीर प्रक्रिया पार पडल्या. शनिवारी (ता. 25) सकाळी किडनी व डोळे बजाज हॉस्पिटल, यकृत एमजीएम रूग्णालयात प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आले. अवयवदानाच्या संमतीत नातेवाईकांचा होकार देण्यास उशीर झाल्याने हृदय प्रत्यारोपण होऊ शकले नाही, अशी माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे समन्वयक मनोज गाडेकर यांनी दिली 

आतापर्यंत यकृत हे मुंबईला प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात येत होते. मात्र लिव्हर ट्रान्सप्लांट ची मान्यता एमजीएमला मिळाल्याने यावेळी यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया एमजीएम रूग्णालयात सुरू आहे. यासाठी मुंबईच्या ग्लोबल हॉस्पटलची टीम शहरात दाखल झाली आहे. या अवयवदानामुळे मराठवाड्यातील पहिली यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया तर मराठवाड्यातील हे पंधरावे तर औरंगाबादेतील बारावे अवयव प्रत्यारोपण ठरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT