car
car 
मराठवाडा

औरंगाबाद: कार झाडाला धडकून दोन डॉक्टर ठार

मनोज साखरे

औरंगाबाद : स्विफ्ट कार झाडाला धडकून दोन डॉक्टर ठार झाले तर तिसरे डॉक्टर गंभीर जखमी झाले. हि घटना औरंगाबादेतील रामनगर कमानीजवळ पहाटे अडीच ते तीन दरम्यान घडली.

गोविंदकुमार सतनामसिंग (वय 25, रा. मूळ हरियाणा) लक्ष्मीकांत दगडीया (वय 25, रा. रामनगर) अशी मृत डॉक्टरची नावे आहेत. तर कारमधील अरविंद पवार (रा. म्हाडा कॉलनी) हे डॉक्टर गंभीर  जखमी झाले आहेत. तिघे पहाटे कारने जाताना रामनगर येथील कमानीजवळ त्यांची कार एका झाडाला धडकली. धडक एवढी जोरात होती की गोविंदकुमार व लक्ष्मीकांत हे ठार झालेत.

या घटनेनंतर मुकुंदवाडी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड, पोलीस शिपाई मुंढे, ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नोंद झाली. अरविंद पवार अपेक्स हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करतात; मृत  गोविंदकुमार आणि लक्ष्मीकांत सावंगीकर रुग्णालयात प्रॅक्टिस करीत होते अशी माहिती मुकुंदवाडी पोलिसानी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने कोलकाताला दिला दुसरा धक्का; नारायणपाठोपाठ अर्धशतक करणारा सॉल्टही परतला माघारी

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT