औरंगाबाद - प्रोझोन मॉलमधील गीतांजली ज्वेलरी शॉपमध्ये झडती घेताना ‘ईडी’चे पथक.
औरंगाबाद - प्रोझोन मॉलमधील गीतांजली ज्वेलरी शॉपमध्ये झडती घेताना ‘ईडी’चे पथक. 
मराठवाडा

औरंगाबादेतही ‘गीतांजली’वर ‘ईडी’चा छापा

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - शहरातील प्रोझोन मॉलमधील शॉपरस्टॉप या विक्री दालनात असलेल्या गीतांजली ज्वेलरी शॉपमध्ये सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी (ता. १९) छापा घातला. ग्राहक बनून त्यांनी दुकानात प्रवेश केल्यानंतर खरी ओळख सांगितली. त्यानंतर सायंकाळपर्यंत दहा ते बारा जणांच्या एका पथकाने झडतीसत्र राबविले. पंजाब नॅशनल बॅंकेची सुमारे ११ हजार कोटी रुपयांची फसवणूक करणारा व्यावसायिक नीरव मोदी याच्या नातलगाचे हे शॉप असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. 

सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास गीतांजली ज्वेलरी शॉपमध्ये ईडीचे पथक धडकले. या पथकाने व्यवहार व काही कागदपत्रांची पडताळणी केली. सकाळी अकरा वाजेपासून सुरू असलेले झडतीसत्र सायंकाळपर्यंत सुरूच होते. याबाबत सूत्रांनी सांगितले, की ज्वेलरी खरेदी-विक्रीसह काही व्यवहारांची पडताळणी ईडीच्या पथकाने केली असून, ही कागदपत्रे त्यांनी जप्त केली आहेत. याबाबत ज्वेलरी व्यवस्थापकाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी याबाबत उद्या माहिती देण्यात येईल, असे सांगितले. 

गोपनीयपणे छापा 
अत्यंत गोपनीय पद्धतीने ‘ईडी’कडून छापा टाकण्यात आला. या वेळी पंधरा ते वीस मिनिटे शॉपमध्ये काय सुरू आहे, कोण व्यक्ती तपासणी करीत आहेत, याची आजूबाजूच्या शॉपचालकांना खबरही नव्हती. ईडीचा छापा पडल्याचे लक्षात आल्यानंतर विक्री दालनात भयाण शांतता पसरली होती. दरम्यान, ‘सकाळ’च्या बातमीदाराने ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांशी वार्तालाप केला. त्यावेळी ‘आम्ही गीतांजली शॉपमध्ये झडतीसत्र राबवीत आहोत,’ एवढेच त्यांनी सांगितले. त्यानंतर या प्रकरणात बोलण्याचे अधिकार आपणास नसल्याचे सांगून वरिष्ठ सर्व कारवाईची माहिती देतील, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT