Cylinder
Cylinder 
मराठवाडा

स्वतः सिलिंडर आणल्यास वाचणार

संदीप लांडगे

औरंगाबाद - ऐनवेळी गॅस सिलिंडर संपले आणि ते तुम्ही गोदामामधून जाऊन आणले तर तुम्हाला एजन्सीला द्यावे लागणारे डिलिव्हरी चार्जेस देण्याची गरज नाही. तुम्हाला बिलात १९ रुपये ५० पैसे सूट मिळेल. 

कुणाला गॅस सिलिंडर घरपोच मिळत नसेल; तर संबंधित ग्राहक सिलिंडर गोदामामधून घेऊन येऊ शकतो. त्यानंतर एजन्सीकडे डिलिव्हरी चार्जेसचे १९ रुपये ५० पैसे देण्याची गरज नाही. सध्या गॅस सिलिंडरचा दर ७४२ रुपये आहे. त्यामधून ग्राहकाला १९ रुपये ५० पैसे परत मिळविता येतात. हे पैसे देण्यास कोणतीही एजन्सी नकार देऊ शकत नाही. ही रक्कम दरवेळी डिलिव्हरी चार्ज म्हणून ग्राहकाकडून आकारली जाते. सगळ्या एजन्सीची ही रक्कम ठरलेली आहे. आगोदर ही रक्कम १५ रुपये होती; परंतु दीड महिन्यापूर्वी यात बदल करून ती रक्कम आता १९ रुपये ५० पैसे करण्यात आली आहे. जर आपण सिलिंडर आणण्यास गेलात आणि आपल्याला डिलिव्हरी चार्जेसचे पैसे वितरकांकडून मिळाले नाही तर तुम्ही १८००२३३३५५५ या टोल फ्री नंबरवर तक्रार करू शकता.

असे मिळवा फ्री रेग्युलेटर 
जर तुमच्या सिलिंडरचे रेग्युलेटर लिक असेल, तर तुम्ही ते मोफत बदलून घेऊ शकता. यासाठी ग्राहकाकडे एजन्सीचे सबक्रिप्शन व्हाऊचर असणे आवश्‍यक आहे. त्यासाठी लिक रेग्युलेटर एजन्सीमध्ये घेऊन जावे. त्यानंतर सबक्रिप्शन व्हाऊचर आणि रेग्युलेटरचा नंबर चेक केला जातो. दोन्ही नंबर मॅच झाल्यानंतर आपल्याला रेग्युलेटर बदलून मिळेल.

ग्राहकाला मिळतो विमा  
ग्राहकांना एका वर्षात सबसिडीचे बारा सिलिंडर दिले जातात. हा कोटा पूर्ण झाल्यानंतर ग्राहक मार्केट दरात सिलिंडर खरेदी कररू शकतो. सिलिंडर दुर्घटनेत ग्राहकांना १ ते ५० लाखांपर्यंत विमा दिला जातो.

वजन करून देणे बंधनकारक
ग्राहकाने मागणी केल्यास सिलिंडरचे वजन करूनच देणे गॅस एजन्सीवर बंधनकारक आहे. त्यासाठी पन्नास किलो वजन क्षमतेचा वजन-काटा सिलिंडर वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे असणे अपेक्षित आहे; परंतु हा नियम अनेक ग्राहकांना माहीत नाही. अनेक ठिकाणी तर वजन करण्याची मागणी ग्राहकाने केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आम्ही वजन-काटा घेऊन कुठे फिरायचे, असा उलट प्रश्‍न करून एजन्सीचे कामगार वजन करावयाचे असेल तर एजन्सीमध्ये येऊन गॅस घेऊन जा, असा सल्ला नागरिकांना देत असल्याचा अनुभव आहे. 

वजनमापे विभागाकडे करा तक्रार
प्रत्येक सिलिंडरवर गॅस आणि रिकाम्या टाकीच्या वजनाचा तपशील असतो. भरलेल्या सिलिंडरचे वजन ३०.४ किलो असते, तर रिकाम्या सिलिंडरचे वजन १४.२ किलो असते. याचाच अर्थ सिलिंडरमध्ये १६.२ किलो गॅस असणे अपेक्षित आहे. यापेक्षा कमी वजनाचा सिलिंडर देण्यात येत असेल, तर नागरिकांना गॅस एजन्सी, गॅस कंपनी आणि वजनमापे विभागाकडेही तक्रार करता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT