Marathi News Aurangabad news sand transport in Aurangabad Corruption
Marathi News Aurangabad news sand transport in Aurangabad Corruption 
मराठवाडा

औरंगाबादेत वाळू वाहतूकीसाठी पोलिसांना तीन कोटींचे हप्ते 

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद - आम्ही ठेकेदाराकडून वाळू घेऊन विक्री करतो. त्यामुळे आम्ही माफीया नव्हे तर व्यापारी आहोत. मात्र, नियमानुसार वाहतूक करीत असतानाही एका ट्रकचालकाकडून पोलिस अधिकाऱ्यांना दोन लाखांपर्यंत हप्ता द्यावा लागतो. जिल्ह्यात जवळपास शंभराहून अधिक ट्रक नियमाने वाहतूक करीत असून यासाठी जवळपास तीन कोटीहून अधिक रुपयांचे पोलिसांना हप्ते द्यावे लागतात, असा गौप्यस्फोट वाळू वाहतूक संघर्ष समितीचे भाऊसाहेब आंधळकर यांनी येथे केला. 

या कारभाराविरुद्ध गुरुवारी (ता. 14) विभागीय आयुक्‍तालयावर महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाळू वाहतूकदारांवर नियमबाह्यरित्या होत असलेल्या कारवाई विरोधात माहिती देण्यासाठी बुधवारी (ता. 13) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. आंधळकर यांनी राज्यातील संपूर्ण गौण खनिजांची शासनाने स्वतःच्या नियंत्रणात विक्री करावी, राज्यावरचे सर्व कर्ज आम्ही फेडू असे थेट आव्हान दिले. महसूल व पोलिस प्रशासनाकडून वाळू वाहतूक करणाऱ्यांना हप्त्यासाठी त्रास दिला जातो. नियमबाह्य गुन्हे आणि दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. चोरून बोटीचा, जेसीबी, पोकलेनचा वापर करून गौण खनिजांची चोरी करणाऱ्यांमध्ये वाळू वाहतूक दारांचा समावेश करू नये, वाळूवर असा दरोडा घालणाऱ्यांवर मोका कायद्याअंर्तगत कारवाई करण्यात यावी, संपूर्ण राज्यात दंडाचे नियमसारखे असावे, यांसह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जातोय. यात जालना, औरंगाबाद, बुलढाणासह इतर जिल्ह्यातील वाळू वाहूतकदार सहभागी होणार आहेत. यावेळी शेख अशपाक पटेल, अनिस देशमुख, फिरोज खान, कलीम पटेल, निसार खान उपस्थित होते. 

नियमानुसार वाहतूक करूनही हप्ते घेतात. 
कायदेशीररित्या वाळूचे पैसे भरून सुद्धा पोलिसांकडून वाहने अडवली जात आहेत. नियमबाह्यरित्या ही वाहने चार- चार दिवस थांबवून ठेवली जातात. केवळ पैसे न दिल्यामुळे अशी चुकीची कारवाई पोलिसांकडून होत असल्याचा आरोप आंधळकर यांनी केला. संबधित हद्दीतल्या पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत हा हप्ता पोहचविण्यासाठी पोलिस कर्मचारी किंवा पंटर नेमलेला असतो, असा दावाही त्यांनी केला. 

कुठल्या मार्गावर किती हप्ता? 
कन्नड - औरंगाबादसाठी एका ट्रकमालकाकडून दोन लाख, जालना चोपडा औरंगाबाद दीड लाख तर फर्दापूर ते औरंगाबाद 1 लाख 80 हजार रुपये हप्ते द्यावे लागतात. जवळपास शंभरहून अधिक वाहने नियमानुसार वाहतूक करीत असतानाही महिन्याला पाच कोटींहून अधिक रुपयांचा हप्ता पोलिस घेतात. विशेष म्हणजे आमच्याकडे सर्वांची नावे आहेत, ती सध्यातरी सांगता येणार नाहीत, असेही श्री. आंधळकर सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT