Water-Supply
Water-Supply 
मराठवाडा

पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्यांची दुरुस्ती करून चोवीस तास उलटत नाहीत तोच सोमवारी (ता. १९) सकाळी ढोरकीनजवळ सातशे मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे पॅकिंग निखळले. त्यानंतर दुरुस्तीसाठी काल जलवाहिनी बंद करण्यात आल्याने पुन्हा एकदा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. 

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातशे आणि तेराशे मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली होती. जायकवाडी पंपहाऊसजवळ जलवाहिनीची वेल्डिंग निखळली आणि फारोळा येथील जलवाहिनीचे रबरसील खराब झाल्यामुळे पाणीपुरवठा अकरा तास बंद करण्यात आला होता. त्यानंतर रविवारी (ता. १८) पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोच सोमवारी सकाळी ढोरकीन जवळील पंपहाऊस येथे सातशे मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे पॅकिंग निखळले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने पाणीपुरवठा बंद करण्यात आला. दुपारपर्यंत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पाचपासून पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला. दरम्यान, तेराशे मिलिमीटरच्या एकाच जलवाहिनीद्वारे कमी दाबाने पाणी आल्याने टाक्‍या भरण्यास उशीर झाला. त्यामुळे मंगळवारच्या (ता. २०) पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी सांगितले, की ढोरकीनजवळ जुन्या ७०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे पॅकिंग निखळल्यानंतर जलवाहिनी बंद करण्यात आली. सकाळी सातपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सायंकाळी पाचपर्यंत काम पूर्ण करण्यात आले. असे असले तरी शहराचा मंगळवारचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT