marathi news latur news theft gold silver thirty six thousand 
मराठवाडा

लातूर येथे चोरांचा धुमाकुळ

बालाजी कवठाळे

बोरोळ (जि. लातूर) - देवणी तालुक्यातील दवणहिप्परगा व बोळेगाव येथे चोरट्यांनी बुधवारी (ता. 7) रात्री एकाच वेळी चोऱ्या केल्या. या घटनेत चोरट्यांनी आठ तोळे सोने, एक किलो चांदी व रोख 36 हजार रूपये लंपास केले आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांनी सांगितले, की दवणहिप्परगा येथील डॉ. अनिल दिगंबर संगमे यांच्या घरी चोरट्यांनी रात्री अडीच वाजता प्रवेश करून चोरी केली. डॉ. संगमे यांच्या खोलीला बाहेरून रूमालाने बांधून चोरट्यांनी त्यांच्या घरातील चार तोळे सोने, रोख अठरा हजार रूपये व एक किलो चांदी चोरून नेली. चोरीची चाहूल लागताच डॉ. संगमे जागे झाले. त्यांनी नातेवाईकांनी मोबाईलवरून जागे केले. मात्र, सर्वजण येईपर्यंत चोरट्यांनी पलायन केले. तोंडाला रूमाल बांधून चार चोरटे निघून गेल्याचे शेजारच्या महिलेने पाहिले. डॉ. संगमे हे उदगीरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत. दुसऱ्या घटनेत बोळेगाव येथे चोरट्यांनी बंद घर फोडून चार तोळे सोने व रोख अठरा हजार रूपये लंपास केले. बोळेगाव येथील मंडूबाई वैजनाथ पाटील या आपल्या मुलीकडे वलांडी येथे गेल्या होत्या. याचा फायदा उठवून चोरट्यांनी ही चोरी केली. शेजारच्या घरातील साडी नेसून चोरट्याने ही चोरी केल्याची चर्चाही ऐकायला मिळाली. या घटनेनंतर पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण करून चोरट्यांना कसून शोध सुरू केला आहे. चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking: आजपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही एलपीजी सिलिंडर;ताबडतोब करा 'हे' काम

सायप्रसकडे फक्त पर्यटनस्थळ म्हणून पाहू नका; भारतीय व्यवसायांसाठी मोठी संधी, विराज कुलकर्णींचा दावा

Hockey World Cup : पाकिस्तानचा मुर्खपणा, महत्त्वाचे सामान न घेताच खेळायला आले; रेफरीने बरोबर धारेवर धरले; माजी कर्णधार म्हणाला...

आईने इस्लाम स्वीकारला आणि आम्हालाही... शर्मिला टागोर यांची लेक सबा पतौडीचा खुलासा; म्हणाली - आम्ही कधीही मंदीरात...

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

SCROLL FOR NEXT