jeep accident 
मराठवाडा

उमेदवारांच्या जीपला अपघात; एक ठार

सुरेश रोकडे

नेकनूर : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी बीडला निघालेल्या उमेदवारांची जीप बीड- मांजरसुंबा रस्त्यावर उलटून नेकनूरच्या विद्यमान सरपंचांचे बंधू शेख वशीद अन्वर (वय ३४) यांचा मृत्यू झाला तर इतर सात जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. २७) सकाळी घडली. 

बीड तालुक्यातील सर्वांत मोठ्या नेकनूर ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी (ता २६) मतदान झाले. बुधवारी बीड तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. बुधवारी सकाळी निकाल ऐकण्यासाठी अर्शद अन्वर त्यांचे बंधू शेख वशीद व सदस्यपदाचे काही उमेदवार जीप (क्र. एमएच ४४ जी- २१८) मधून बीडला येत होते. प्रमिलादेवी महाविद्यालयासमोर स्टेअरींगवरील ताबा सुटल्याने जीप रस्त्याखाली उतरली.

शेतात ६० फूट अंतरावर जाऊन जीप उलटली. वशीद अन्वर स्वत: जीप चालवत होते. जीपखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सरपंच अर्शद अन्वर, मयूर काळे, बिभीषण शिंदे, अरशमीद सय्यद, रशीद पठाण, सलमान सय्यद व गुड्डू काझी यांचा जखमींत समावेश आहे. त्या सर्वांना खासगी वाहनातून तातडीने बीडला उपचारासाठी हलविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''मुंबईला चाललो म्हणून निघाले अन् रात्रीतूनच दिल्लीला गेले'', धनंजय मुंडेंच्या दिल्लीवारीची इनसाईड स्टोरी

IPL 2026 लिलावात अनसोल्ड राहिला, पण पठ्ठ्याने धीर नाही गमावला! देशासाठी नाबाद १७८ धावांची खेळी, २५ चौकारांचा पाऊस

Latest Marathi News Live Update : अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील - आमदार अमोल मिटकरी

Women Joint Pain: महिलांना सतावतेय हिवाळ्यातील सांधेदुखी; योग्‍य तपासण्‍या, जीवनशैलीविषयक बदल करण्‍याचा तज्ज्ञांचा सल्‍ला

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रवासबंदीचा बडगा; आणखी वीस देशांच्या अमेरिकावारीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT