मराठवाडा

शेतमालाला भाव मागितला तर गोळ्या घालतात : डॉ. आढाव

सकाळवृत्तसेवा

बीड : फासावर चढून शेतकरी मरत असताना, सीमेवर जवान गोळ्या खात असताना केंद्र, राज्य सरकारला काहीही फरक पडत नाही. कामगारांमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा डाव असून, शेतीमालाला भाव मागितला तर राज्य सरकार गोळ्या घालत असल्याचा आरोप राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केला. 

असंघटित कष्टकऱ्यांची पेन्शन परिषद आणि हमाल मापाडींच्या विसाव्या द्वैवार्षिक अधिवेशनास येथे शनिवारी (ता. 25) सुरवात झाली. अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. आढाव बोलत होते. खासदार डॉ. प्रीतम मुंडे, स्वागताध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार उषा दराडे, बापूसाहेब मकदूम, समाजवादी नेते प्रा. सुभाष वारे, हरीश धुवड, सुभाष लोमटे, अविनाश घुले, सभापती दिनकर कदम, गणपत डोईफोडे, हमाल मापाडी महामंडळाचे राजकुमार घायाळ आदी या वेळी उपस्थित होते. 

डॉ. आढाव यांनी केंद्र, राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. केंद्र, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव आणि कष्टकऱ्यांच्या घामाला दाम देणार की नाही असा सवाल करून डॉ. आढाव यांनी शेतकरी, ऊसतोड मजूर व असंघटित क्षेत्रात कार्यरत कामगारांना पेन्शन, शेतमालाला हमीभाव, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नोटाबंदी, जीएसटीमुळे व्यवहार मंदावले असून, त्याचा फटका कष्टकऱ्यांनाही बसत असल्याचे त्यांनी सांगिले. 

आमदार जयदत्त क्षीरसागर, खासदार डॉ. मुंडे, उषा दराडे, प्रा. सुभाष वारे, राजकुमार घायाळ आदींची भाषणे झाली. 

सरकारने मनसेला सुपारी दिली 
आढाव म्हणाले, शेतकरी कर्जमाफी, कामगारांच्या प्रश्नांवर दिलेली आश्वासने राज्य सरकारने पाळली नाहीत. शिवसेना वरचढ होऊ लागली, की 'मनसे'ला पुढे केले जात आहे. मुंबईत रेल्वेस्थानकावर झालेल्या अपघातानंतर 'मनसे'ने फेरीवाल्यांविरुद्ध आंदोलन सुरू केले. राज्य सरकारने सुपारी देऊन हे आंदोलन करण्यास भाग पाडल्याचा आरोपही त्यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT