hailstrom 
मराठवाडा

लातूर: अहमदपूर तालुक्यात गारांचा पाऊस

धोंडोपंत कुलकर्णी

हडोळती (जि. अहमदपूर) : या परिसरातील हडोळती, हिप्पळगाव, वळसंगी परीसरात मंगळवारी (ता. १३) रात्री दहा वाजता अर्धातास गारांचा पाऊस झाला. रात्री पडलेल्या गारांचा थर बुधवारी (ता. १४) सकाळपर्यंत कायम होते. या तुफानी गारांमुळे गहू, हरभरा पिकांसह टोमॅटोचेही मोठे नुकसान झाले आहे. 

रात्रीच्या गारपीटीनंतर शेतकऱ्यांनी सकाळी शेतात धाव घेतल्यानंतर झालेल्या नुकसानीची माहिती एकमेकांना दिली. त्यानंतर पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नियोजन केले असून ते रवाना झाले आहेत. रात्री दहाच्या सुमारास अर्धा तास गारांचा तडाख्यामुळे शेतीचे नुकसान प्रचंड झाले आहे. जीवीत हानीचा अंदाज अजूनपर्यंत मिळाला नाही. काढणीस आलेल्या रब्बी हंगामाचा तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. असा गारपिठीचा तडाका पहिल्यांदाच अनुभवल्याची चर्चा नागरिकातून व्यक्त होत आहे. टोमॅटो, हरभरा, गहू आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मोहरांनी बहरलेले आंब्याचेही नुकसान झाले आहे. सकाळी गारांचा सहा इंचाचा थर जागोजागी दिसत होता.

आपल्या शेतात पडलेला गाराचा थर व त्यामुळे झालेल्या नुकसानीचे फोटो शेतकरी वॉटसअपवरून पाठवत होते. याबाबत अहमदपूरचे तहसीलदार प्रवीण मेंगशेट्टी म्हणाले, की रात्री झालेली गारपीठचे नुकसान मोठे असून अहमदपूर तालुक्यात काही भागात ही गारपीठ झाली आहे. नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी महसूल प्रशासनाचे कर्मचारी रवाना झाले असून तातडीने माहीती शासनाला देण्यात आली आहे. आपत्ती ला खचून न जाता शेतकऱ्यांनी हातबल होवू नये प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: भारत-पाकिस्तान 'सुवर्ण' लढत! श्रीलंकेला लोळवून श्रेयस अय्यरचा संघ फायनलमध्ये; केव्हा होणार हा महामुकाबला?

पत्ता बदलण्यासाठी Form 8 भरला अन् कुटुंबातील सहा सदस्यांची नावेच गायब; SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी

Wicknell Chivayo Death : झिम्बाब्वेत हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; जगप्रसिद्ध उद्योगपती विकनेल चिवायोसह सहा जणांचा मृत्यू

Jio ची मोठी ऑफर! 6 महिन्यांचा रिचार्ज आणि 14GB डेटा मिळणार फ्री; 'या' युझर्सना होणार फायदा...

Latest Marathi News Live Update : MPSC विद्यार्थ्यांचं 2 ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT