Marathi Publishers At Sahity Sammelan Osmanabad  
मराठवाडा

मंदीमुळे प्रकाशकांना उत्सुकता अन्‌ चिंताही

सुशांत सांगवे

लातूर : मागील वर्षी यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तक प्रदर्शनाची जय्यत तयारी करण्यात आली होती; मात्र पुस्तक विक्रीचा आलेख खाली उतरला होता. त्यामुळे उस्मानाबाद येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात पुस्तक विक्रीला प्रतिसाद मिळेल का? की मंदीमुळे येथेही वाचक पाठ फिरवतील, याबाबत काही प्रकाशकांमध्ये उत्सुकतेचे तर काही प्रकाशकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


उस्मानाबाद येथे यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाला अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आयोजकांकडून संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. संमेलनस्थळी विविध कार्यक्रमांसाठी वेगवेगळे मांडव उभारले जात आहेत. याबरोबरच ग्रंथदालनासाठीही वेगवेगळे मांडव उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दोनशेहून अधिक ग्रंथदालने या मांडवात पाहायला मिळणार आहेत; पण पुस्तक विक्री किती होईल, याकडे प्रकाशकांचे लक्ष लागले आहे.


अक्षरधाराचे रमेश राठीवडेकर म्हणाले, साहित्य संमेलनात पुस्तकांची उलाढाल कोटीच्या घरात जाते. पण मागील वर्षी सुमारे 50 लाख रुपयांचीच उलाढाल झाली होती. पद्मगंधा प्रकाशनगृहाचे अरुण जाखडे म्हणाले, की उस्मानाबाद, लातूर, तुळजापूर, बार्शी या भागांत अवांतर पुस्तकांची दुकाने नाहीत. असली तर तिथे पुस्तके सहज उपलब्ध होत नाही. ही कमतरता साहित्य संमेलन भरून काढणार आहे. त्यामुळे पुस्तकांना प्रतिसाद मिळेल, असे वाटते. प्रदर्शनात केवळ विक्री हाच उद्देश नसतो. त्यामुळे पुस्तके, पुस्तकांमधून लेखक, पुस्तकांत होणारे बदल, त्यांची छपाई-तंत्रज्ञान हेही वाचकांना पाहायला मिळते. त्यातून सकारात्मक वातावरण तयार व्हायला मदत होते. या दृष्टीनेही पुस्तक प्रदर्शनाकडे पाहायला हवे.

संमेलनाध्यक्षांच्या पुस्तकांचे खास दालन
साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या पुस्तकांचे खास दालन संमेलनस्थळी पाहायला मिळणार आहे. याबाबत राजहंस प्रकाशनाचे सदानंद बोरसे म्हणाले, दिब्रिटो यांच्या पुस्तकांना वाचकांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यांचे नाव संमेलनाध्यक्ष म्हणून जाहीर झाल्यानंतर तो आणखी वाढला आहे. संमेलनस्थळीही त्यांच्या पुस्तकांचे खास दालन आम्ही उभारणार आहोत. यात सृजनाचा मळा, ओऍसिसच्या शोधात, नाही मी एकला (आत्मकथन) अशा पुस्तकांचा समावेश असेल.

साहित्य संमेलनातील जवळजवळ 200 ग्रंथदालनांचे बुकिंग आतापर्यंत झाले आहे. त्यामुळे प्रकाशकांमधून चांगला प्रतिसाद आहे, हे स्पष्ट होते. सासवडसारख्या ग्रामीण भागात झालेल्या संमेलनात ग्रंथविक्री मोठ्या प्रमाणात झाली होती. तसाच प्रतिसाद उस्मानाबादमध्ये मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे.
-  सुनीताराजे पवार, सदस्य, ग्रंथप्रदर्शन समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट यांचे VHT मधील दोन सामने झाले; आता कोणत्या तारखेला पुन्हा मैदानावर दिसणार? कोहलीच्या निर्णयाने सारे चकीत

Mumbai Municipal Election : मुंबईत ‘ठाकरे ब्रँड’ची ताकद पणाला! विभागप्रमुखांऐवजी उमेदवारीची सूत्रे थेट ‘मातोश्री’, ‘शिवतीर्था’वर

MPSC Exam : हजारो विद्यार्थी अपात्रतेच्या उंबरठ्यावर! पीएसआय पदासाठी वयोमर्यादा गणनेची अट; एक संधी देण्याची मागणी

Budh Mahadasha: तब्बल 17 वर्षांची बुध महादशा! ‘या’ राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार

PMC Election: पुण्यात भाजप कुणाला उमेदवारी देणार? निष्ठावंतं की नेत्यांच्या मर्जीतील? मुंबईत वर्षा बंगल्यावरील बैठकीची Inside Story

SCROLL FOR NEXT