Accident Death Sakal
मराठवाडा

काल आज्जी अन् आज नातवावर काळाचा घाला; अपघातात दोघांचा मृत्यू

आपली आजी वारल्याने ते अंतविधीसाठी शिरूर ताजबंद येथे आले होते.

सकाळ वृत्तसेवा

अहमदपूर : तालुक्यातील थोरलेवाडी पाटी जवळ गुरूवारी ( ता.27) मोटरसायकल व स्विफ्ट डिझायर कार अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना घडली आहे.(Marathwada Accident News)

शिरूर ताजबंद येथील उत्तम उर्फ मेघवर्धन ज्ञानोबा डोंगरे ( 25 वर्ष) व राजेंद्र रामेश्वर चव्हाण ( 24 वर्ष) दोघे दुपारी एक वाजता शाईन कंपनीची दुचाकी( एम.एच.24 बी.एच.8280) वाहन घेऊन कांही खाजगी कामानिमित्त अहमदपूर कडे निघाले होते. अहमदपूर ते शिरूर रस्त्यावर सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या थोरलेवाडी पाटीजवळ समोरून येणा-या स्विफ्ट डिझायर कंपनीच्या चारचाकी( एम.एच.24 ए.डब्लू 5369) वहान व वरील युवकांची मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन मेघवर्धन डोंगरे व राजेंद्र चव्हाण या दोन्ही युवकांचा जाग्यावर मृत्यू झाला.

काल आजी व आज नाताचा मृत्यूने डोंगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर.

पदवीधर असलेले अपघातातील मयत मेघवर्धन डोंगरे पुणे येथे कंपनीत नोकरी करीत होते.बुधवारी ( ता.26) आपली आजी वारल्याने ते अंतविधीसाठी शिरूर ताजबंद येथे आले होते.

नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 या काँक्रीट रस्त्याचे काम चालू आहे.अहमदपूर ते शिरूर ताजबंद या दहा किलोमीटर अंतरवरील काॅक्रेटचा कांही रस्ता वाहतूकीसाठी खुला केला असून या रस्त्यावर वहाने अधिक गतीने चालवली जात असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT