cotton rate increases in private market in yavatmal 
मराठवाडा

Marathwada Crime: कापूस खरेदी- विक्रीच्या व्यवहारात व्यापाऱ्याची १२ कोटींची फसवणूक, गुन्हा दाखल !

Latest Sambhajinagar Crime News | फिर्यादीवरून, दोन्ही संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sambhajinagar Crime: कापूस खरेदी- विक्रीच्या व्यवहारात व्यापाऱ्याची १२ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत एमआयडीसी चिकलठाणा भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी मुंबईच्या दोन आरोपींविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्याम त्रिलोकचंद अग्रवाल (वय ४५ रा. चिकलठाणा एमआयडीसी) यांनी तक्रार दाखल केली. त्यांचा कापसाच्या गाठी खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. चिराग विनोदकुमार पित्ती आणि प्रवीण शेली (दोघे रा. मुंबई) यांनी अग्रवाल यांच्याकडून कापसाच्या गाठीचा माल विकत घेतला होता. या गाठीच्या खरेदीची रक्कम त्यांनी दिली नाही.

तसेच अग्रवाल यांचा राजस्थान झालावाड येथे ठेवलेला कापसाचा धागादेखील त्यांनी परस्पर विक्री करीत त्याची रक्कम स्वतःकडे ठेवून घेतली. अग्रवाल यांनी एकूण १२ कोटी ६४ लाख ५३ हजार रुपयांची रक्कम मागितली असता आरोपींनी 'तुमची कोणतीही रक्कम आमच्याकडे बाकी नाही', असे सांगितले. तसेच ही रक्कम हडपण्यासाठी बनावट लेजर बुक तयार केले. फिर्यादीवरून, दोन्ही संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT