मराठवाडा

Marathwada Crime: गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक! डबलबोरचे काडतुसही केले जप्त

Dharashiv Crime: लोहारा पोलीस पथकाने सालेगाव (ता. लोहारा, जि. धाराशिव) येथे केलेल्या कारवाईत गावठी पिस्टल (बंदुक) व डबलबोरचे काडतुस जप्त करून यावेळी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघा आरोपींना अटक करण्यात आले आहे.

सुधीर कोरे

Lohara Crime: पेट्रोलिंगवर असलेल्या लोहारा पोलीस पथकास गुप्त बातबीदारामार्फत माहिती मिळाल्यावरुन मंगळवारी (ता.२) सालेगाव (ता. लोहारा) येथे केलेल्या कारवाईत गावठी पिस्टल (बंदुक) व डबलबोरचे काडतुस मिळून आले असून यावेळी गावठी पिस्तूल बाळगणारे दोघा आरोपींना अटक करण्यात आले आहे.

या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की मंगळवारी (ता.२) सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतिले, पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे, जेवळी बीट अंमलदार कांतू राठोड, सास्तुर आऊट पोस्ट अंमलदार विठ्ठल ढवण, पो. का. विजय घोडके हे माकणी हद्दीत पेट्रोलिंगवर होते .

या पथकास गुप्त बातबीदारामार्फत माहिती मिळाली की, सालेगाव येथीली रणजीत कालीदास यादव (वय २७) व सुरज रुपसेन देशपांडे (वय १९) यांनी गावठी पिस्टल (बंदुक) व डबलबोरचे काडतुस आणले आहेत त्वरित या पथकाने सदर ठिकाणी जावून सदरील इसमांना पंचासमक्ष ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून गावठी पिस्टल (बंदुक) व डबलबोर चे काडतुस मिळून आले.

यावेळी रणजीत यादव व सुरज देशपांडे या आरोपीस पथकाने ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा शेलार यांचे मार्गदर्शनाखाली, पो. का. विजय घोडके यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे लोहारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT