cotton sakal
मराठवाडा

मराठवाडा : कापूस वाळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान : योग्य भाव मिळण्याची नाही शाश्वती

अशोक खुळे

टाकरवण : परिसरात यंदा कापसाची मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. यंदा सुरुवातीला पाऊस चांगला असल्याने कपाशी पीक चांगले बहरले होते. परंतु कापसाच्या पहिल्या वेचणीवरच पाणी फेरल्या गेले. अनेकांचा कापूस ओला झाला. सध्या गावोगावी वेचणी केलेला कापूस वाळवण्याची धडपड शेतकरी करीत असल्याचे दिसून येत आहेत.

दिवाळीच्या सुरुवातीला कापसाची पहिली वेचणी होऊन दिवाळी आनंदात जाईल, या आशेवर शेतकरी होते. परंतु अतिवृष्टीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरविले. परिसरात झालेल्या पावसाने सोयाबीन, मूग, ज्वारी या पिकांसोबतच कपाशीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.

कापसाची पहिली वेचणी होण्याआधीच कपाशीला पावसाने झोडपले. कापसाची बोंडे सडली. यामुळे यंदा पावसामुळे ओला झालेला कापूस उन्हात वाळवून विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाच्या उघडिपीनंतर कापूस वेचणीची मजुरी वाढवून शेतकऱ्यांनी कापसाची वेचणी सुरू केली. वेचून आणलेला कापूस घरासमोर वाळत घालण्यासाठी शेतकरी आता धडपड करीत आहेत. अनेकांच्या घरासमोर कापूस वाळत घातलेला दिसून येत आहे. ओल्या कापसाचा दर्जा खालावल्याने त्याला योग्य तो भाव मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे पहिल्याच वेचणीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

वेचण्यासाठी मिळेना मजूर...

पावसाच्या उघडिपीनंतरही अनेक शेतांमध्ये सध्या पाणी असल्याने कापूस वेचणीसाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे जादा मजुरी देऊन कापूस वेचावा लागत आहे. कापसाच्या शेतातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. पहिल्या वेचणीबरोबरच पावसाने कपाशीचे झाडेही खराब झाली आहेत. त्यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Marathi Cinema : शरद गोरे यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभर डंका

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

T20 WC, IND vs PAK: '२४ तास थांबा, त्यानंतर...', सूर्यकुमार यादव पाकिस्तानसोबत हँडशेक करण्याबाबत काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT